Home /News /mumbai /

फक्त बोट दाखवलं आणि मुंबईत तरुणाला खावी लागली जेलची हवा; नेमकं काय आहे प्रकरण वाचा

फक्त बोट दाखवलं आणि मुंबईत तरुणाला खावी लागली जेलची हवा; नेमकं काय आहे प्रकरण वाचा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

मुंबईच्या रस्त्यावर फक्त बोट दाखवणंही तरुणाला महागात पडलं.

    मुंबई, 11 डिसेंबर : आपल्यावर कुणी बोट उचललं किंवा आपल्याकडे कुणी बोट दाखवलं तर किती तरी जणांना राग येतो. माझ्याकडे बोट दाखवू नको नाहीतर तोडून हातात देईन असंही काहीजण रागात म्हणतात. पण असंच बोट दाखवणं तरुणाला इतकं महागात पडलं आहे की त्याची रवानगी थेट तुरुंगात झाली आहे. मुंबईतील ही धक्कादायक प्रकरण आहे. एक 33 वर्षांचा तरुणाने रस्त्यावर एका वृद्ध महिलेला मधलं बोट दाखवलं (Man Flashes Middle Finger To Old Woman), तिला बोट दाखवून तिथून निघण्याचा प्रयत्न करत होता पण पोलिसांनी त्याला पकडलं आणि जेलमध्ये डांबलं. माहितीनुसार या तरुणाने एका  66 वर्षीय महिलेला पाहून अश्लील इशारा केला. ही महिला आपल्या मुलासोबत कारमध्ये बसली होती. ट्रॅफिक सिग्नलला त्यांची कार थांबली होती. त्यावेळी महिलेने विरुद्ध दिशेने एक कार आपल्या गाडीजवळ येत असल्याचं पाहिलं. जीव वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी आपली कार डिव्हायडरजवळ नेली.  लाल रंगाच्या गाडीने विरुद्ध दिशेने जवळपास 100 मीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केला. पुढील ट्रॅफिक सिग्नलवर ही कार थांबली आणि त्या कारमधील तरुणाने महिलेला मधलं बोट दाखवलं. हे वाचा - OMG! ... अन् विमानात आलं 'उलटीचं वादळ'; नेमकं काय घडलं पाहा या घटनेनंतर महिलेने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण लाल रंगाच्या गाडीतील ड्रायव्हर मात्र शांत झाला नाही. तो त्यांच्या गाडीला धक्का मारून पळण्याचा प्रयत्न करत होता. महिलेच्या मुलाने त्याच्या गाडीला अडवलं आणि लगेच पोलिसांना फोन केला. पोलिसांनी त्या तरुणाला अटक करून त्याला तुरुंगात टाकलं. त्याच्यावर लैंगिक छळ, पाठलाग करणं आणि महिलेला अश्लील इशारा करणं असे आरोप लावण्यात आले. या प्रकरणी स्पष्टीकरण देताना त्या तरुणाने सांगितलं की महिला आणि तिचा मुलगा पैशांसाठी त्याच्यावर खोटे आरोप करत आहेत. कोर्टाने त्याला फटकारलं. घटनेवेळी महिला आपल्या मुलासोबत होती आणि ती ज्या तरुणावर आरोप लावले त्याला ओळखतही नव्हती, त्यामुळे पैशांसाठी हा आरोप लावण्यात आलेला नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. हे वाचा - 'प्रेयसीचं निधन झालंय आणि..'; तरुणाची विचित्र उत्तरं ऐकून खळखळून हसाल, VIDEO दरम्यान या प्रकरणाचा पोलीस  सीसीटीव्ही फुटेजमार्फत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crime, Mumbai, Viral

    पुढील बातम्या