क्रूरतेचा कळस! आधी स्क्रू ड्रायव्हरने मांजरीला भोसकलं, मग लटकवलं घराबाहेर

क्रूरतेचा कळस! आधी स्क्रू ड्रायव्हरने मांजरीला भोसकलं, मग लटकवलं घराबाहेर

संजयने मांजराची हत्या केल्यानंतर तिला काठीवर टांगलं आणि घराच्या बाहेर ठेवलं. या क्रूरतेचे फोटो तेव्हा प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते.

  • Share this:

मुंबई, 09 ऑक्टोबर- मुक्या प्राण्यावर क्रूरता दाखवल्याप्रकरणी चेंबूरमधील 40 वर्षीय संजय गडेला 9 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. क्रूरतेचा कळस म्हणजे संजयने स्क्रू ड्रायव्हरने एका मांजरीला भोसकत तिची हत्या केली. मे 2018 मधील ही घटना असून चेंबूर येथील राहत्या घराच्या बाहेर संजयने मांजराला स्क्रू ड्रायव्हरने भोसकले होते. याबदल्यात न्यायालयाने संजयला 9 हजार 150 रुपयांचा दंड आकारला.

टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, संजयने मांजराची हत्या केल्यानंतर तिला काठीवर टांगलं आणि घराच्या बाहेर ठेवलं. या क्रूरतेचे फोटो तेव्हा प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. संजयने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे फौजदारी न्यायालयाने साक्षीदाराचा जबाब न घेता संजयला दोषी ठरवले.

संजयला अनेक कलमांतर्गत दोषी ठरवण्यात आले असले तरी त्याला तुरुंगात पाठवण्यात आले नाही. यामागचं कारण स्पष्ट करताना न्यायालयाने संजय गडे शारीरिक आणि मानसिकरित्या अस्वस्थ असल्यामुळे त्याला तुरुंगवासाची शिक्षा देऊ शकत नाही.

मांजरीला मारण्यामागचं कारण सांगताना संजय म्हणाला की, त्याला मांजरीचा भयंकर राग आला होता. संजयच्या घरात येऊन मांजरीने संपूर्ण घर अस्थाव्यस्थ केलं होतं. याचमुळे त्याने मांजरीला मारण्याचा निर्णय घेतला. याशिवाय इंदिरा नगर, चेंबुर येथील रहिवाशांनी सांगितले की, संजय नोकरीच्या शोधात होता. त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती. 14 मे 2018 रोजी त्याने मांजरीला अतिशय क्रूरतेने मारले आणि तिच्या शरीराची विल्हेवाट लावली.

दरम्यान, एका रहिवाशाने संजयचा घराबाहेर काळ्या रंगाच्या मांजरीला काठीवर लटकवलेला फोटो काढला. यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पहावं ते नवलंच! खिडकीची काच तोडून महिलेवर सांभारने मारली उडी, VIDEO VIRAL

शॉर्ट घालून जाणाऱ्या मुलीला गाडी थांबवून त्याने विचारलं 'कपडे नाहीयेत का?'

कुत्र्यांना फिरवायला गेलेल्या व्यक्तीवर कोसळली वीज, पाहा हा धक्कादायक VIDEO

आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO

Published by: Madhura Nerurkar
First published: October 9, 2019, 4:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading