मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai: राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागणारी टोळी गजाआड, सिनेसृष्टीतील तिघांना ठोकल्या बेड्या

Mumbai: राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागणारी टोळी गजाआड, सिनेसृष्टीतील तिघांना ठोकल्या बेड्या

Extortion on name of Raj Thackeray in Mumbai: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Extortion on name of Raj Thackeray in Mumbai: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Extortion on name of Raj Thackeray in Mumbai: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 17 ऑक्टोबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नावाने खंडणी (extortion) मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल होताच मालवणी पोलिसांनी तिघांना अटक (Malavani police arrest 3 people) केली आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये सिनेसृष्टीतील तिघांचा समावेश आहे. या घटनेच्या संदर्भातील एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक महिला राज ठाकरेंचं नाव घेत एका सुरक्षारक्षकाला मारहाण करत आहे. राज ठाकरेंना तू ओळखत नाहीस का? काम कोणासाठी करतोस आणि महाराष्ट्रात, मुंबईत कसा राहतोस? असे सवाल करत आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोऱ्हाडे आणि चालक सागर सोलनकर यांचा समावेश आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

व्हिडीओ व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक महिला सुरक्षारक्षकाला मारहाण करत आहे. ही महिला आपल्या सहकारअयांसोबत मढ येथील एका बंगल्यावर गेली होती. त्यावेळी संभाषणा दरम्यान सुरक्षारक्षकाने राज ठाकरेंना ओळखत नसल्याचं म्हटलं. यानंतर संतापलेल्या या महिलेने त्याला मारहाण केली. ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पोलिसांनी काय दिली माहिती?

मालवणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनुराग दिक्षित यांनी सांगितले की, दयानंदा या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. 15 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल करुन आयपीसी कलम 452, 385, 323, 504, 507 34 अन्वये गुन्हा दाखल केली आहे. यापैकी तीन इसमांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक महिला रात्र असल्याने पोलीस ठाण्यात आली नाही. त्या महिलेला नोटीस बजावण्यात आली आहे.

नागपुरात खंडणी घेताना काँग्रेस नेत्याला अटक

जून महिन्यात खंडणी मागणाऱ्या काँग्रेसच्या नेत्याला अटक करण्यात आली होती. नागपूरमधील काँग्रेस नेते त्रिशरण सहारे यांना खंडणी प्रकरणात नागपूर पोलिसांनी रंगेहात अटक केली. कामठीमधील भू-माफिया रंजीत सफेलकरच्या सोबत झालेला आर्थिक व्यवहार पुढे आणू नये यासाठी विश्वजित किरदत्त यांना एक लाखाची खंडणी मागण्यात आली होती. ती घेताना त्रिशरण सहारे यांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

सुत्रांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार कुख्यात रंजीत सफेलकर याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याशी संबंधित प्रकरणांची पोलिसांनी चौकशी केली. त्यादरम्यान रंजीत सफेलकरच्या बँख खात्यांचीही चौकशी झाली. त्याच्या खात्यांच्या चौकशीमध्ये पोलिसांना समजलं की, सुमारे 4 वर्षांपूर्वी त्याच्या उमरेड रोडवरील टेमसना गावाजवळच्या 15 एकर सेतीची रक्कम सफेलकरच्या बँक खात्यातून राजघराण्यातील सदस्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली आहे. ही बातमी वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यानंतर सहारे राजघराण्यातील एका सदस्याला रंजीतबरोबरच्या फोटोवरून ब्लॅकमेल करत होता. या ब्लॅकमेलिंगला कंटाळल्यानं या सदस्यानं पोलिस आयुक्तांकडे याची तक्रार केली. त्यानंतर चौकशीत समोर आले की, बंडू सहारे नावाच्या व्यक्तीने राजघराण्यातील एका सदस्याशी संपर्क केला होता. तेव्हापासून तो ब्लॅकमेल करत होता. पत्रकारांकडे असलेला रंजीतबरोबरचा फोटो छापल्यास बदनामी होईल अशी धमकी देत, फोटो न छापण्यासाठी 2 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

First published:

Tags: Crime, MNS, Mumbai police, Raj Thackeray