मुंबईत कोव्हिड सेंटरमध्ये माणुसकीला काळीमा, सुरक्षारक्षकाकडून महिलेचा विनयभंग

मुंबईत कोव्हिड सेंटरमध्ये माणुसकीला काळीमा, सुरक्षारक्षकाकडून महिलेचा विनयभंग

मुंबईतल्या मालाड इथल्या खासगी रुग्णालयातील कोव्हिड सेंटरमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Share this:

मुंबई, 06 नोव्हेंबर : कोरोना काळात एकमेकांची मदत केली जात असताना मुंबईतील कोव्हिडी सेंटरमधून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतल्या मालाड इथल्या खासगी रुग्णालयातील कोव्हिड सेंटरमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रुग्णालयातील सुरक्षारक्षकावर महिलेची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

कुरार परिसरात असणाऱ्या पठाणवाडी जंक्शन जवळ असलेल्या डीएनए या खाजगी हॉस्पिटलमधल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये सुरक्षारक्षकाकडून विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्री महिलेच्या खोलीत शिरला आणि त्याने तिचा हात पकडला. महिलेनं मदतीसाठी आरडाओरडा केला तिथे असलेली बेल वाजवली. दरम्यान त्यावेळी रुग्णालयातील स्टाफ तिच्या जवळ आला आणि त्यांनी सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतलं.

हे वाचा-पुण्यातील धक्कादायक घटना, लग्नाचे आमिष दाखून आतेभावानेच केला बलात्कार

कोव्हिड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग केल्याच्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रुग्णालयातील 21 वर्षीय सुरक्षारक्षकाला स्टाफनं पोलिसांचा हवाली केलं आहे. कुरार पोलिसांनी सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतलं असून न्यायालयात हजर केलं आहे. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 6, 2020, 11:57 AM IST
Tags:

ताज्या बातम्या