महिलेला कारसह उचलून नेणारा वाहतूक पोलीस निलंबित

महिलेला कारसह उचलून नेणारा वाहतूक पोलीस निलंबित

  • Share this:

11 नोव्हेंबर :  एक महिला आपल्या बाळाला स्तनपान करत गाडीत असताना गाडी टो करून नेणाऱ्या वाहतूक पोलिसांला  तात्पुरतं निलंबित करण्यात आलंय.

मुंबईतील मालाड इथं एसव्ही रोडवर हा प्रकार घडलाय. राखी नावाची महिला आपल्या सात महिन्याच्या मुलाला गाडीत स्तनपान करत होती. तेव्हा ट्रॅफिक पोलीस अधिकारी शशांक राणे यांनी रस्ताच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला बाजूला काढण्याचं सांगितलं. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर शशांक राणे यांनी कारमध्ये महिला आपल्या मुलासोबत बसलेली असतानाही कार टो करून नेली. राखी यांनी आपल्या मुलाची तब्येत ठीक नाही असंही सांगितलं पण तरीही कार टो करण्यात आली.

राखी यांनी आपल्यासोबत घडलेला हा सगळा प्रकार फेसबुकवर लाईव्ह केलं. त्यानंतर अवघ्या काही तासात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. लोकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधीत पोलिसाला निलंबित करण्याची मागणी केलीये. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर शशांक राणे या वाहतूक पोलिसाला निलंबित करण्यात आलयं.

First published: November 11, 2017, 8:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading