मुंबई, 06 फेब्रुवारी : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारक प्रकल्पाच्या रचनेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याऐवजी उभा पुतळा उभारण्याच्या पर्यायाचा विचार सुरु आहे. गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या सरदार पटेल यांच्या पुतळ्यासारखा शिवाजी महाराजांचा उभा पुतळा उभारण्याच्या पर्यायावर विचार सुरु असल्याचे कळते. या शिवाय पुतळ्याच्या अन्य 3 ते 4 आराखड्यांवर अभ्यास करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
Special Report : सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवस्मारकाला खीळ कुणामुळे?