लोकसभा निवडणुकीच्या आधी आणखी एक पुलवामा घडवले जाईल-राज ठाकरे

लोकसभा निवडणुकीच्या आधी आणखी एक पुलवामा घडवले जाईल-राज ठाकरे

येत्या दोन महिन्यात पुलवामा सारखा पुन्हा हल्ला केला जाईल, असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला.

  • Share this:

मुंबई, 09 मार्च: मुंबई, 09 मार्च: येत्या दोन महिन्यात पुलवामा सारखा पुन्हा हल्ला केला जाईल, असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला. मोदींच्या आयटी सेलमध्ये बसलेली बेवारस मुलांकडून केल्या जाणाऱ्या ट्रोलला मी भीक घालत नाही, असे सांगत राज यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर 'सर्जिकल स्टाईक' केला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या मुलाच्या कंपनीत पाकिस्तानी भागीदार कसा चालतो असा सवाल देखील त्यांनी विचारला.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात लवकरच निर्णय

गेल्या 24 फेब्रुवारी रोजी मी कोल्हापुरात बोललो होतो. त्यानंतर आज बोलतोय. मी गेले कित्येक दिवस पत्रकारांनी भेटलोच नाही तर पत्रकार स्वत: ठरवतात की, मनसेने 3 जागा मागितल्यात 4 जागा मागितल्या. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मी लवकरच निर्णय घेईन. तो तुम्हाला सांगितला जाईल, असे राज म्हणाले.

रोज नवं काही तरी घडाव अशी मोदींची इच्छा

तुम्ही मागच्या घटना विसराव्यात यासाठी मोदी सरकारला रोज नवी काही तर घडाव असे वाटते. गेल्या पाच वर्षात सरकारने इतके विषय दिले आहेत की एका सभेत ते संपणार नाहीत. माझ्या पुढील सभेत त्याचा समाचार घेईन असे राज म्हणाले.

काय म्हणाले राज

लोकसभा निवडणुकीसंदर्भात जो निर्णय घ्यायचा आहे तो मी नंतर घेईन

रोज काही तरी घडाव आणि मागच लोकांनी विसरावं हीच मोदी सरकारची इच्छा

लोकसभा निवडणुकीसंदर्भात लवकरच निर्णय घेणार

मी ट्रोलला भीक घालत नाही

पुढे आहेतच माझ्या सभा त्यावेळी बोलीलच - एका भाषणात सर्व बोलणं होणार नाही

युद्धाची भाषा करणाऱ्यांना राज यांच्याकडून समाचार

मोदींच्या आयटी सेलमधील बेवारस मुले ट्रोल करत असतात

राज याच्या भाषणावेळी 'चौकीदार चोर है'च्या घोषणा

अजित डोवल यांच्या मुलावर राज ठाकरे यांची टीका

डोवल यांच्या मुलाच्या कंपनीतील एक भागीदार पाकिस्तानचा

भाजपला दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती शिकवण्याचा काय अधिकार?, राज यांचा सवाल

पुलवामा हल्ल्याची अलर्ट मिळाल्यानंतर सरकारने दुर्लक्ष केले

पुलवामा झाल्यानंतर मोदींचे स्टायलिस्ट फोटो प्रसिद्ध

एअर स्टाईकनंतर खोट्या बातम्या पेरल्या गेल्या

जवानांचे अभिनंदन पण भारतीय लष्कराला खोटी माहिती दिली

राफेलची गरज व्यक्त करून मोदींनी जवानांचा अपमान केला

जवान शहीद झाल्यानंतर मोदींकडून दु:खाचे नाटक

मोदींना जवानांपेक्षा व्यापाऱ्यांचे शौर्य मोठे वाटते

=================================================

First published: March 9, 2019, 6:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading