Home /News /mumbai /

'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ शिवसेनेची पुन्हा गुजराती बांधवांना साद

'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ शिवसेनेची पुन्हा गुजराती बांधवांना साद

राज्यातील 10 मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेनं गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.

मुंबई, 05 जानेवारी : मुंबई महापालिकेची निवडणूक (mumbai municipal corporation election 2022) पुढील वर्षी होणार आहे. पण, आतापासूनच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी असलेल्या शिवसेनेनंही (Shivsena) आता निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा गुजराती बांधवांना साद घातली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आता मैदानात उतरले आहे. शिवसेनेनं आपल्या पारंपारिक मराठी विभागा व्यतिरिक्त अमराठी बांधवांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यातील 10 मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेनं गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. IND vs AUS: टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू बॉर्डर-गावसकर मालिकेतून आऊट! 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ या मथळ्याखाली शिवसेनेचा मेळावा होणार आहे. भाजपच्या पारंपारिक गुजराती मतदाराला शिवसेनेकडे आकर्षित करण्यासाठी रननीती आखली आहे. मुंबईतील गुजराती बांधवांसाठी सेनेच्या वतीने 10 तारखेला मुंबईतील जोगेश्वरी भागात मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात 100 गुजराती बांधव शिवसेनेत प्रवेश करतील अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती बांधव शिवसेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबद्दल गुजराती आणि मराठीत निमंत्रण पत्रकं  प्रसिद्ध करण्यात आली आहे. Deepika @ 35: 'त्या' घटनेनंतर जवळजवळ 6 महिने डिप्रेशनमध्ये होती दीपिका पादुकोण विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. त्यावेळी 'केम छो वरळी' असं म्हणत गुजराती बांधवांना साद घातली होती. शिवसेनेच्या या भूमिकेवर विरोधकांनी टीका केली होती. पण, निवडणुकीत शिवसेनेला याचा फायदा झाला होता. आताही पालिका निवडणुकीच्या तोंडावर सेनेनं भाजपला शह देण्यासाठी पुन्हा गुजराती कार्ड वापरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: गुजरात, शिवसेना

पुढील बातम्या