S M L

मुंबई कोणाची? मिलिंद देवरा वि.अरविंद सावंत,दक्षिण मुंबईत कोण मारणार बाजी?

काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या दिवसांतच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आलं. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्याकडे संघटनात्मक पाठबळ आहे. हे आव्हान पेलून अरविंद सावंत इथे कशी लढत देतात हे पाहावं लागेल.

Updated On: Apr 25, 2019 05:55 PM IST

मुंबई कोणाची? मिलिंद देवरा वि.अरविंद सावंत,दक्षिण मुंबईत कोण मारणार बाजी?

विवेक कुलकर्णी

मुंबई, 25 एप्रिल :

दक्षिण मुंबई, उत्तर मुंबई यासोबतच उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, इशान्य मुंबई या मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. मेट्रो रेल्वे, मोनोसारखे वाहतूक प्रकल्प आणि घरबांधणी यामुळे भाजपला मुंबईमध्ये फायदा होणार असला तरी नोटबंदी, जीएसटी, शहरी भागातली वाहतुकीची संरचना, प्रवाशांची सुरक्षितता या मुद्द्यांचं आव्हान भाजपसमोर आहे.


मिलिंद देवरा नवे अध्यक्ष

काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या दिवसांतच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आलं. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्याकडे संघटनात्मक पाठबळ आहे. काही उद्योगपतींनीही त्यांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे याचा त्यांना फायदा होऊ शकतो, असं म्हटलं जातं. त्यांचे दिवंगत वडील मुरली देवरा यांनी याआधी या मतदारसंघात केलेलं काम आणि विश्वासार्ह प्रतिमा याही त्यांच्या जमेच्या बाजू ठरतील, अशी चिन्हं आहेत.

शिवसेनेची खराब कामगिरी

Loading...

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची इथे समाधानकारक कामगिरी झाली नाही. मेट्रो लाइनमुळे गिरगावच्या मराठी रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न इथे गाजतो आहे. त्याचबरोबर झवेरी बाजार, काळबादेवी इथला व्यापारीवर्ग नोटंबदी, जीएसटी या मुद्द्यांमुळे भाजप सरकारवर नाराज आहे. याचाही अरविंद सावंत यांच्या लढतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे फॅक्टर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत आहेत. काळा चौकीच्या सभेत राज ठाकरेंनी शिवसेनेला मतदान करू नका, असंही आवाहन केलं होतं. याचा फटका भाजपला किती बसेल हे निकालातच कळेल. त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचा मतदानावर किती परिणाम होतो हाही प्रश्न आहे.

=============================================================================

VIDEO: ...म्हणून राहुल गांधी 'रोड शो'ला आले नाहीत, मिलिंद देवरांनी सांगितलं कारण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2019 05:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close