News18 Lokmat

Loksabha Election 2019: राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, पाहा 17 उमेदवारांची नावे

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2019 03:43 PM IST

Loksabha Election 2019: राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, पाहा 17 उमेदवारांची नावे

मुंबई, 15 मार्च: राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने काल (गुरुवारी) 12 जणांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज शुक्रवारी अन्य 5 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. नगर आणि माढा या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची याबद्दलचा अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे तिसऱ्या यादीत नगर आणि माढाच्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पवार यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली.

पहिली यादी-

रायगड- सुनील तटकरे

बारामती- सुप्रिया सुळे

सातारा- उदयनराजे भोसले

Loading...

ठाणे- आनंद परांजपे

जळगाव- गुलाबराव देवकर

बुलढाणा- राजेंद्र शिंगणे

परभणी- राजेश विटेकर

उत्तर पूर्व- संजय दिना-पाटील

कल्याण- बाबाजी पाटील

कोल्हापूर- धनंजय महाडिक

लक्षद्विप- मोहम्मद फैझल

हातकणंगले- स्वाभिमानी शेतकरी पक्षाला पाठिंबा

दुसरी यादी-

नाशिक- समीर भुजबळ

शिरुर- डॉ.अमोल कोल्हे

दिंडोरी-धनराज महाले

मावळ- पार्थ पवार

बीड- बजरंग सोनवणे


VIDEO: युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड है टूटेगा नाही- मुख्यमंत्री


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2019 03:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...