साध्वी प्रज्ञासिंग यांच्या विधानाचे भाजपकडून निर्लज्ज समर्थन- राज ठाकरे

मुंबई हल्ल्यात झालेल्या शहीद पोलिस अधिकाऱ्यांच्याबाबत विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानाचे भाजप निर्लज्जपणे समर्थन करत असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2019 10:18 PM IST

साध्वी प्रज्ञासिंग यांच्या विधानाचे भाजपकडून निर्लज्ज समर्थन- राज ठाकरे

भांडूप, 24 एप्रिल: मुंबई हल्ल्यात झालेल्या शहीद पोलिस अधिकाऱ्यांच्याबाबत विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानाचे भाजप निर्लज्जपणे समर्थन करत असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मुंबईतील भांडूप येथे सभेत त्यांनी पुन्हा एकदा मोदी, शहांसह  भाजपवर हल्ला चढवला.


पाहा काय म्हणाले राज- VIDEO : राज ठाकरेंनी भाजपच्या जाहिरातीतील 'त्या' कुटुंबाला बोलावून केला मोठा खुलासा


अपडेट

Loading...

5 वर्ष मोदींनी फक्त खोटा प्रचार केला

साध्वींच्या विधानाच मोदी-शहांकडून समर्थन

पोलिसांबद्दल भाजपला काहीच वाटत नाही

साध्वी प्रज्ञासिंग यांच्या विधानाचे भाजपकडून निर्लज्ज समर्थन

बॉम्बस्फोटातील आरोपीला तिकीट कसं दिले?

नमामि गंगे खरतर राजीव गांधींनी सुरु केली होती

सरकारकडून जाहीरातीवर 4 हजार 500 कोटी खर्च

आणीबाणीच्या पुढची स्टेप आहे ही तुमच्यापर्यंत बातम्या पोचू द्यायच्या नाही

मी गेल्या 4 वर्षात खूप टीका केल्या, तुम्ही चांगलं केलं असता तर स्तुती केली असती- इतक्या कोत्या मनाचा नाही मी

काश्मीरच्या लोकांना काम हवंय त्यांच्याकडे काम नाही आणि त्यांचा वापर मग दहशतवादाचा केला जातो

10 माणसं जरी मेली असती तरी आमचा अभिनंदन आला नसता आणि त्याला जर सोडला असता तर इम्रान खानला उभा जाळला असता

आज पाकिस्तानचा पंतप्रधान सांगतो भारताचा पंतप्रधान कोण हवा ते

रेल्वे अपघात झालेल्या मोनिका मोरेला मदत करण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले होते त्यानंतर भाजपाने त्याचे भांडवल केले. मात्र आजपर्यंत काहीही झाले नाही.

आज मोनिका मोरेला रोजगार मिळाला नाही, तिला राज ठाकरेंनी मंचावर बोलवून घेतले.

२०१४ ते २०१७ पर्यंत १८ हजार ४२३ लोक रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडले

देशांच्या आरपीआयचे गव्हर्नर निघून गेले, सुप्रीम कोर्टाचे जज पुढे आले आणि प्रेस घेतली हे कधी नव्हे ते झालं


VIDEO : अलादीनचा चिराग सापडला तर कोणत्या इच्छा पूर्ण करणार? मोदी म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2019 08:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...