Home /News /mumbai /

Mumbai Lockdown: मुंबईत लॉकडाउन होणार की नाही? पालकमंत्र्यांचं सूचक वक्तव्य

Mumbai Lockdown: मुंबईत लॉकडाउन होणार की नाही? पालकमंत्र्यांचं सूचक वक्तव्य

मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा जम्बो कोव्हिड सेंटर सुरू करणार असल्याचं पालक मंत्री अस्लम शेख म्हणाले. (Lockdown in Mumbai) लॉकडाउन करणार का याबाबतही त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

मुंबई, 18 मार्च: दररोज वाढत जाणारा कोरोनारुग्णांचा आकडा (Coroavirus latest updates) पाहता मुंबईत लॉकडाउन लावायची गरज पडू शकते, असं चर्चेत आहे. कडक लॉकडाउन लावायला लावू नका, असं मुख्यमंत्री सांगत असूनही कोरोना नियमांचं उल्लंघन नागरिकांकडून होत आहे. पण सध्या तरी गेल्या वर्षीसारखा कडक लॉकडाउन (Mumbai lock-down news) लागणार नाही, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या वक्तव्यावरून दिसतं. मुंबईत लाॅकडाउन सारखे नियम प्रथम जिथ रुग्ण आढळतात ती सोसायटी कंटेन्मेंट झोन करून मग गरज पडली तर नियम कडक करू असं शेख म्हणाले. शहरात टप्प्या टप्प्याने कडक नियम केले जातील, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी News18लोकमतला दिली आहे. मुंबईत कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने टप्प्याटप्प्याने ताळेबंद लावावा लागेल, असे संकेत देखील दिले आहेत. "राज्यात कोरोना वाढतो तसाच मुंबईत वाढतो पण आम्ही सगळे परिस्थिती लक्ष ठेवून आहेत. मुंबई शहरात परत काही ठिकाणी रुग्ण वाढत असल्याचे लक्षात घेत जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करतो आहोत. यासंदर्भात महापालिका हाॅस्पिटलची तयारी पूर्ण झाली आहे. रुग्णालयात बेड शिल्लक आहेत, पण खासगी रुग्णालयात गर्दी जास्त केली जात आहे", असं ते म्हणाले. महाराष्ट्रात राजेश टोपेंनी सांगितला Lockdown ऐवजी नवा पर्याय सार्वजनिक वाहतुकीमुळे रुग्णांची संख्या जास्त वाढत आहे अशी चर्चा जोरदार सुरू असताना याबाबत बोलताना असलम शेख म्हणाले की, लोकल किंवा बेस्ट, एसटी बसमध्ये गर्दी  आहे हे खरं. पण सध्या मुंबईत रुग्ण आढळतात ते मोठ्या सोसायटीतून.  हे लोक लोकल प्रवास करणारे किती हा विचार केला पाहिजे. उच्चभ्रू सोसायटी आणि प्रभाग अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आहे. तुलनेने झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीय भागांमध्ये रुग्णसंख्या तितकीशी वाढलेली नाही. त्यामुळे लोकल बेस्ट एसटी सेवा याबाबत तात्काळ बंद करणे ही मागणी योग्य नाही असं ते म्हणाले. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्री उशिरापर्यंतपब डिस्को, रात्री उशिरापर्यंत हाॅटेलांमध्ये गर्दी दिसत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आणि पोलिसांनी यासंदर्भात कारवाई करत आहे. तसे आदेश दिले गेले आहेत. आता याच्या पुढचा भाग म्हणजे निर्बंध कडक केले जातील, असं शेख म्हणाले.
First published:

Tags: Coronavirus, Covid-19, Lockdown, Mumbai

पुढील बातम्या