Home /News /mumbai /

मुंबईत बनावट QR कोडचा पर्दाफाश, मास्टर माइंडला ठोकल्या बेड्या

मुंबईत बनावट QR कोडचा पर्दाफाश, मास्टर माइंडला ठोकल्या बेड्या

कोरोना काळात लोकलनं केवळ अत्यावश्यक सेवांना प्रवास करता येतो मात्र त्यासाठी QR कोडद्वारे पास तयार केला जातो.

    मुंबई, 01 ऑक्टोबर : कोरोना काळात अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही लोकलनं प्रवास कऱण्याची परवानगी नाही. या काळ्यात नागरिकांची खोटे QR कोड देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला आहे. मुंबई रेल्वे पोलीसांच्या टीमनं खोटे क्यू आर कोड तयार करून देणाऱ्या मास्टर माईंडला अटक केली. या तरुणानं या प्रवाशांना खोटे क्यू आर कोड तयार करून दिले आहेत त्या प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिस राठोड असं या आरोपीचं नाव असून त्याच्या मुस्क्या आवळण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं आहे. अनिस राठोड मुंबईतील अॅन्टोपहिल परिसरात रहिवासी. या परिसरातून लोकांना लोकलनं प्रवास करण्यासाठी खोटे क्यू आर कोड तयार करून देण्याचं काम सुरू होतं. हे क्यू आर कोड तयार करून देण्याच्या बदल्यात जवळपास 500 ते 1000 रुपये उकळण्याचं काम तो करत होता. हे सर्व तेव्हा उघडकीस आलं जेव्हा वडाळा GRP ने वडाळा स्टेशन वरून दोघांना खोटे क्यू आर पास असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणी त्यांची कसून चौकशी केल्यानंतर अनिल राठोड हे नाव पुढे आलं. हे वाचा-यूपीमधील हाथरसनंतर बलरामपूरमध्ये दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार, पीडितेचा मृत्यू वडाळा पोलिसांनी अनिस राठोडला गाठून त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्यासह घरातील साहित्य ताब्यात घेण्यात आलं. ज्या लोकांना त्याने क्यू आर कोड तयार करून दिला ते सगळे छोट्या मोठ्या दुकानात काम करणारे कामगार होते. कोविड संकट पाहता अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी 15 जून पासून लोकल ट्रेन सुरू करण्यात आली. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणी प्रवास करु नये म्हणून महाराष्ट्र सरकार ने QR कोड ही यंत्रणा सुरू केली. याचाच फायदा घेण्यासाठी खोटे क्यू आर कोड तयार करणारी टोळी सक्रिय झाली. अनिस राठोड ने आता पर्यंत 400 ते 500 खोटे QR कोड तयार करून लोकांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणी तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती घेणं सुरू आहे अशा प्रकारची आणखीन टोळी सक्रिय आहे का आणि खोटे क्यू आर कोड दिलेल्या लोकांचा सध्या शोध सुरू आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Mumbai

    पुढील बातम्या