धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू

धावत्या लोकलमधून पडून तरुणीचा जागीच मृत्यू

कोपर आणि दिवा स्थानकाच्या मध्येच सविता या लोकलमधून खाली पडल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Share this:

डोंबिवली, 22 जुलै : कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू झाला आहे. सविता नाईक (30) असं मृत तरुणीचं नाव असून सविता या डोंबिवलीतील रहिवासी असल्याचं माहिती समोर आली आहे.

सविता नाईक या डोंबिवलीहून सुटलेल्या सीएसएमटी फास्ट लोकलने प्रवास करत होत्या. पण कोपर आणि दिवा स्थानकाच्या मध्येच सविता या लोकलमधून खाली पडल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच डोंबिवली जीआरपीची टीम घटनास्थळी दाखल झाली. मृत सविता नाईक यांचा मृतदेह डोंबिवलीत नेला जाणार असल्याची माहिती आहे.

सविता या लोकलमधून खाली नक्की कशामुळे पडल्या, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र गर्दीत धक्का लागल्याने त्यांचा तोल गेला असल्याचा अंदाज बांधला जात आहे. याबाबत पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, गर्दीमुळे धक्का लागल्याने लोकलमधून खाली पडून प्रवाशांचा जीव गेल्याच्या घटना याआधीही अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे याबाबत रेल्वेकडून काय उपाययोजना करण्यात येतात का, हे पाहावं लागेल.

धमक्या देऊ नका, नाही तर माज उतरवणार; शिवसेनेच्या मंत्र्याची भाजपला धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 11:15 AM IST

ताज्या बातम्या