Home /News /mumbai /

अति घाई...धावत्या लोकलमध्ये चढणाऱ्या महिलेचा थोडक्यात वाचला जीव, अपघाताचा LIVE VIDEO

अति घाई...धावत्या लोकलमध्ये चढणाऱ्या महिलेचा थोडक्यात वाचला जीव, अपघाताचा LIVE VIDEO

अपघातादरम्यान फलाटावर सीआरपीएफ जवान सुभाष भोसले उपस्थित होते. त्यांनी तातडीनं या महिलाला लोकलपासून दूर खेचलं.

    घाटकोपर, 30 ऑक्टोबर : धावत्या लोकलमधून उतरू नका किंवा चढू नका असं वारंवार सांगूनही अनेकदा आपला जीव धोक्यात घालून गडबड असल्यानं नागरिक लोकल पकडण्याचा प्रयत्न करतात अशावेळी होणारे अपघात जीवावर बेतणारे असतात याची कल्पना असून देखील अशाप्रकारच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. असाच एका अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. मुंबईतील घाटकोपर स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये हा भीषण अपघात कैद झाला आहे. फलाटावरून लोकल सुटत असताना चुकलेली लोकल पकडण्यासाठी एक महिला धावत आली. लोकल सुरू झाल्याचं तिला समजलं असून देखील ती पकडण्यासाठी ती पुढे सरसावली आणि तोल जाऊन खाली कोसळली. ही महिला थोडक्यात वाचल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. धावत्या लोकलमध्ये चढण्याचं धडस करताना अचानक तोल सुटला आणि महिला प्लॅटफॉर्मवर कोसळली. या घटनेमुळे काही क्षण गोंधळ उडाला होता. अपघाताची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचवेळी फलाटावर सीआरपीएफ जवान सुभाष भोसले उपस्थित होते. त्यांनी तातडीनं या महिलाला लोकलपासून दूर खेचलं. एका क्षणाचा उशीर झाला असता तर महिलेच्या जीवावर बेतलं असतं. ही घटना 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे. वारंवार रेल्वे प्रशासनाकडून धावत्या लोकलमधून उतरू नये आणि चढू नये असं सांगितलं जात असताना देखील या महिलेनं जीव धोक्यात घालून धाडस केलं. अशाप्रकारचं धाडसं जीवावर बेतू शकतं त्यामुळे धावत्या लोकलमध्ये चढणं किंवा उतरण्याचे प्रकार करू नयेत असं न्यूज 18 लोकमतचं आवाहन आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या