Home /News /mumbai /

लवकरच मुंबईची 'लाइफ लाइन' सर्वांसाठी धावण्याची शक्यता, या वेळेमध्ये करता येईल प्रवास

लवकरच मुंबईची 'लाइफ लाइन' सर्वांसाठी धावण्याची शक्यता, या वेळेमध्ये करता येईल प्रवास

कायम धावत असणार मुंबईची 'लाइफ लाइन' कोरोना काळात दीर्घ कालावधीसाठी बंद होती. कालांतराने काही ठराविक वेळेत आणि ठराविक लोकांसाठी ती सुरू देखील झाली. मात्र आता मुंबईकरांना प्रतीक्षा आहे ती, लोकलसेवा पुन्हा एकदा सुरळीत सुरू होण्याची

    मुंबई, 05 जानेवारी: कायम धावत असणार मुंबईची 'लाइफ लाइन' अर्थात मुंबई लोकल (Mumbai Local) कोरोना काळात (Coronavirus Pandemic) दीर्घ कालावधीसाठी बंद होती. कालांतराने काही ठराविक वेळेत आणि ठराविक लोकांसाठी ती सुरू देखील झाली. मात्र आता मुंबईकरांना प्रतीक्षा आहे ती, लोकलसेवा पुन्हा एकदा सुरळीत सुरू होण्याची. दरम्यान मुंबईकरांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची (Corona Patients in Mumbai) संख्या कमी होऊ लागली आहे. यामध्ये काही प्रमाणात स्थीरता येत आहे. दरम्यान सामान्यांना पूर्णवेळ लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारडून मिळेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान टाइम्स ऑफ इंडियाने सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असे वृत्त दिले आहे की, कमी गर्दीच्या वेळेमध्ये (Non-peak hours) अर्थात सकाळी 7 पूर्वी आणि रात्री 10 वाजल्यानंतर सर्वांना लोकलने प्रवास करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. (हे वाचा-EPFO मध्ये क्रेडिट होत आहे व्याज, तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे आले का?) सध्या केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आणि सरकारने मंजुरी दिलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी आहे. सर्वसामान्य नागरिक अद्याप लोकलने प्रवास करू शकत नाही आहे. त्याचप्रमाणे महिलांना ठराविक कालावधीसाठी लोकलने प्रवास करण्याची परवानगी आहे. मीडिया अहलवालानुसार संबंधित अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे की, या प्रस्ताववर विचार सुरू आहे. ते असं म्हणाले आहेत की, 'आम्ही या आठवड्यामध्ये लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत आढावा घेऊ, पण याची अंमलबजावणी होण्यापूर्वी वेळ जाणार आहे. रेल्व स्थानकांवर गर्दीच्या नियोजनाची कमतरता ही सर्वात मोठी समस्या आहे, यामुळे सोशल डिस्टंसिंग देखील कठीण होणार आहे.'

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या