हे वाचा-सुशांतवरील चित्रपटात दिसणार श्रद्धा कपूरचे बाबा, निभावणार NCB अधिकाऱ्याची भूमिका पश्चिम रेल्वेवर सुरुवातीला साडेतीनशे लोकल चालवल्या जात होत्या मग कर्मचाऱ्यांची गर्दी वाढत असल्यानं पाचशेपर्यंत लोकलच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. यामध्ये दोन महिला विशेष लोकल असणार आहेत. लोकलमध्ये प्रवाशांनी गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रवाशांना लोकलनं प्रवास करण्यास बंदी असून अफवांवर विश्वास ठेवू नये असंही आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. लोकलची होणारी गर्दी आणि एकूण सर्वाचा विचार करता महिलांसाठी हा निर्णय खूपच फायदेशीर असणार आहे. त्यामुळे कोरोना काळात महिला विशेष लोकल सेवा सुरू केल्यामुळे अत्यावश्यक सेवेक काम करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.For Ladies essential staff.. SIX ADDITIONAL ESSENTIAL SERVICES INCLUDING TWO LADIES SPECIAL WEF 28.09.2020 @Central_Railway @Gmwrly @PiyushGoyalOffc @RailwaySeva @RailMinIndia pic.twitter.com/ocRSgiWO1h
— DRM WR MumbaiCentral (@drmbct) September 26, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mumbai, Mumbai local