मुंबई, 26 जानेवारी : मुंबईची लोकल ही प्रत्येक मुंबईकरासाठी लाईफलाईन आहे. रोजच कोट्यवधी मुंबईकर ट्रेनने प्रवास करतात, या प्रवासामध्ये मुंबईकरांना रोजच वेगवेगळे अनुभव येत असतात, पण मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्लो ट्रेनमध्ये किळसवाणा प्रकार घडला आहे. ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये वापरलेला कंडोम ठेवल्याची घटना घडली आहे. यानंतर प्रवाशांमध्ये संतापाचा उद्रेक झाला असून यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
सोमवारी रात्री 9.40 च्या सुमारास एका ट्विटर यूजरने याचा फोटो पोस्ट केला. करी रोड स्टेशनवर ट्रेनमध्ये चढल्यानंतर रेल्वेला या व्यक्तीला सीटवर वापरलेला कंडोम ठेवल्याचं दिसलं. यानंतर या प्रवाशाने लगेचच फोटो ट्वीट करून रेल्वेला याबाबतची माहिती दिली.
'काय दृष्य आहे', असं कॅप्शन या यूजरने फोटोला दिलं. या ट्वीटमध्ये प्रवाशाने मध्य रेल्वे मुंबई विभाग, रेल्वे मंत्रालयालाही टॅग केलं आहे. 9.40 अंबरनाथ स्लो ट्रेनमधलं हे दृष्य आहे. ट्रेन नुकतीच करी रोड स्टेशनवरून निघाली आहे, असंही प्रवासी त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला.
Well, what a sight. A used condom. Hello @drmmumbaicr, @RailMinIndia, @Central_Railway.This is 9.40 #Ambernath slow local. Trainhas crossed #CurreyRoad. @mumbairailusers. pic.twitter.com/C9tzNVB0Qf
— mazdur (@cinemaausher) January 23, 2023
या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर या प्रवाशाने पुन्हा एकदा डोंबिवली स्टेशनवर पोहोचल्यानंतर ट्वीट केलं. डोंबिवली स्टेशनला आल्यानंतरही कंडोम आहे तिकडेच आहे, असं तो म्हणाला.
Please take a action
— Mohammed Hussain (@Mohamme92703637) January 24, 2023
यह हमारे तुच्छ मानसिकता का परिचायक है,अन्यथा सार्वजनिक जगह का दुरुपयोग क्यो करते हैं आम लोग
— brajesh kumar singh (@Brajesh867Kumar) January 24, 2023
Just 1st class things.
— Pawan Bhagat (@ThePhootballGuy) January 23, 2023
मुंबई लोकलमधल्या या किळसवाण्या प्रकाराचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबईकरांनी यावर संताप व्यक्त करतानाच कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी आता मध्य रेल्वे कारवाई करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Central railway, Mumbai local, Train