मुंबई, 30 जुलै: मुंबईतील कोरोना (Corona) बाधितांची संख्या आता आटोक्यात आली आहे. त्यासोबतच लसीकरण (Vaccination) सुद्धा वेगाने सुरू आहे. त्यामुळे आता लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना मुंबई लोकलमधून (Mumbai Local Train) प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनीही मागणी करत सरकारला इशारा दिला आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं, "ज्यांचे लसीकरण पूर्ण जाले आहे त्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी. राजसाहेबांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती. नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल."
ज्यांचे लसीकरण पूर्ण झालं आहे त्यांना लोकल ने प्रवास करण्याची मुभा द्यावी.राजसाहेबांच्या या सूचनेची सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही विनंती नाहीतर महाराष्ट्र सैनिकांना रेल भरो आंदोलन करावे लागेल.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 30, 2021
लोकलचा निर्णय कधी?
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं, लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने विचार सुरू आहे. ज्यांना लसींचे दोन डोस दिले आहेत त्यांना प्रवासाची परवानगी द्यायची का? पण हे करायचं झालं तर तितकी तपासणी यंत्रणा आहे का? रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा करुन मुख्यमंत्री स्तरावर घेतला जाईल.
Jammu Kashmir: एका तासात तीन ठिकाणी दिसले पाकिस्तानी संशयास्पद ड्रोन, BSF ने फायरिंग करताच गायब
राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं पत्र
राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं, गेल्या 15 महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध सरकारने लागू केले आहेत. हे निर्बंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्या त्यात सध्या मुंबई शहरासाठी जे निर्णय गेतले जात आहेत. ते तर अनाकलनीय आहेत.
आपल्या पत्रात त्यांनी पुढे म्हटलं, मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालये सुरू आहेत. सर्वांना धरुन काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागत आहे. त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारने बस सेवेला परवानगी दिली. पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्याने रोगही अधिक पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे बस सुरू आणि लोकल बंद ह्यानं नेमकं काय साध्य होणार?
महाराष्ट्र सरकारने निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीने पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसाने आतापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली आहे. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीने सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू करेल.
त्यामुळे मी माझ्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना अशी मागणी करतो की, मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांसाठी तरी अत्यंत तातडीने सुरू केली जावी असंही राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Mumbai local