मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Local: जुलैपर्यंत 'यांना' लोकल ट्रेनने प्रवासाची परवानगी देण्यास हायकोर्टाचा नकार

Mumbai Local: जुलैपर्यंत 'यांना' लोकल ट्रेनने प्रवासाची परवानगी देण्यास हायकोर्टाचा नकार

Mumbai Local train latest news: कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही असल्याने केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनमधून प्रवासाची परवानगी दिली आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 3 जुलै : कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Pandemic) आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सरकारने केवळ अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतरांना लोकल प्रवास करण्याची परवानगी दिली नाहीये. मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local Train)मधून प्रवासाची परवानगी देण्यात यावी यासाठी प्रवाशांसोबतच इतरही संघटना मागणी करत आहेत. त्यासोबतच वकिलांनीही लोकलने प्रवास करण्याची परवानगी मागितली होती. त्यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) महाराष्ट्र सरकारला विचारणा केली होती.

आता मुंबई उच्च न्यायालयाने लोकल ट्रेनमधून वकिलांना प्रवासाची परवानगी देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटलं, जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत वकिलांना मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही.

साताऱ्यापाठोपाठ 'या' जिल्ह्यात कोरोनाचे थैमान; पॉझिटिव्हिटी रेट तब्बल 12 टक्क्यांवर, कडक Lockdown लागू

न्यायालयाने म्हटलं, "आम्ही वकिलांना जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत लोकल ट्रेनने प्रवासाची परवानगी देऊ शकत नाही. कारण महाराष्ट्र राज्याच्या कोविड संबंधित टास्क फोर्सने कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे."

यापूर्वी मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने वकिलांच्या लोकल प्रवास करण्याच्या परवानगी संदर्भात महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारला विचारणा केली होती. या याचिकेत वकिलांना न्यायालय आणि कार्यालयात जाण्यासाठी लोकल ट्रेन आणि मेट्रोतून प्रवास करण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती.

First published:

Tags: Coronavirus, Mumbai, Mumbai local