Home /News /mumbai /

सर्वसामान्यांसाठी आजपासून लोकलचे दरवाजे खुले, अटी-शर्थींसह लसीकरण झालेल्या प्रवाशांना प्रवासाची मुभा

सर्वसामान्यांसाठी आजपासून लोकलचे दरवाजे खुले, अटी-शर्थींसह लसीकरण झालेल्या प्रवाशांना प्रवासाची मुभा

Mumbai local train updates: कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांसाठी आजपासून मुंबई लोकलचा प्रवास सुरु. कसा मिळवाल लोकलचा ऑनलाईन पास वाचा सविस्तर.

    मुंबई, 15 ऑगस्ट: Mumbai local train: स्वातंत्र्यदिनाच्या (15 August)दिवशी म्हणजेच आजपासून मुंबई लोकल (Mumbai local)पुन्हा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झाली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस (two doses of covid-19 vaccine) घेऊन किमान 14 दिवस उलटलेल्या नागरिकांना मुंबई लोकलनं प्रवास करता येणार आहे. फक्त मासिक पासवर ( pass holders) लोकलने प्रवास करण्याची परवानगी आहे. दररोजच्या प्रवासासाठी तिकीट दिलं जाणार नाही. नियम पाळून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पासची रेल्वेच्या पथकाकडून स्टेशनवर तपासणी सकाळपासून केली जात आहे. असा मिळवा ऑनलाईन पास ऑनलाईन पास मिळवण्यासाठी संबंधित संस्थेला आपात्कालीन व्यवस्थान विभागाच्या https://msdmacov19.mahait.org/ वेबसाईटवर जावं लागेल. वेबसाईटच्या वर डाव्या बाजूला कोपऱ्यात युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास असं बटण (Universal Travel Pass button) आहे. त्यावर क्लिक करा. त्यानंतर असं पेज ओपन होईल. त्यामध्ये Register your Establishment वर क्लिक करा. पुढे जे पेज ओपन होईल, तिथं मागितलेली सविस्तर माहिती भरा. सर्व माहिती भरल्यानंतर I agree to the above conditions या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर रजिस्टरवर क्लिक करा. मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनी राज्यातल्या जनतेला दिला 'हा' इशारा तुम्हाला तुम्ही नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल नंबरवर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचा मेसेज येईल. त्यानंतर संबंधित संस्था ज्या कर्मचाऱ्यांना पास द्यायचा आहे, त्यांची माहिती या पेजवर भरेल. त्यानंतर कर्मचाऱ्यांना त्यांचा पास वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल. कर्मचाऱ्यांना वेबसाईटवर जाऊन Download Travel Pass वर क्लिक करावं लागेल. त्यासाठी त्यांना मोबाईल नंबर द्यावा लागेल. जिथं त्यांना ओटीपी मिळेल. त्यानंतर ई-पास जनरेट करण्यासाठी आपला फोटो अपलोड करावा लागेल. त्यानंतर प्रिंट पासवर क्लिक करून पास मिळवू शकतो. हे तपशील गरजेचे हा पास काढण्यासाठी प्रवाशांना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचं सर्टिफिकेट पुरावा म्हणून अपलोड करावं लागणार आहे. त्याचप्रमाणं लस घेऊन 14 दिवस उलटले आहेत का, याची पडताळणीदेखील दुसरी लस दिल्याच्या तारखेवरून करण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रवाशांना स्वतःच्या आधार कार्डाचे तपशीलही द्यावे लागणार आहेत. लसीकरण सर्टिफिकेटवरील माहिती, आधार कार्ड नंबर आणि ओटीपी यांच्या आधारे प्रवाशांचं व्हेरिफिकेन केलं जाईल आणि त्यानंतर ऑनलाईन पास जारी करण्यात येणार आहे. Independence Day 2021: आतंकवादी बुरहान वाणीच्या वडिलांनी काश्मीरात फडकावला तिरंगा, पाहा EXCLUSIVE फोटो मुंबई लोकलने प्रवासासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 53 उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन लसीकरण पडताळणी प्रक्रियादेखील सुरू आहे. यामध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील स्थानकांचा समावेश आहे. मुंबई महानगरासह आजुबाजूची सर्व शहरे मिळून म्हणजे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात एकूण 109 लोकल रेल्वे स्थानकांवर ही ऑफलाईन पडताळणी सुविधा उपलब्ध आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Mumbai local, Uddhav Thackeray (Politician)

    पुढील बातम्या