Home /News /mumbai /

Mumbai Local Train updates: 'लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना लोकलचं तिकीट मिळणार'

Mumbai Local Train updates: 'लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना लोकलचं तिकीट मिळणार'

Mumbai Local Train updates: 'लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना लोकलचं तिकीट मिळणार'

Mumbai Local Train updates: 'लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना लोकलचं तिकीट मिळणार'

Mumbai Local train news updates: मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लोकल प्रवासाच्या संदर्भात प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

    मुंबई, 31 ऑक्टोबर : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनने (Mumbai local train) प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लसवंत असलेल्या म्हणजेच कोविड प्रतिबंधक लस (Covid vaccine) घेऊन 15 दिवस झालेल्या सर्व नागरिकांना आता लोकल ट्रेनचं तिकीट (Mumbai Local Train Ticket) मिळणार आहे. या संदर्भातील पत्रही राज्य सरकारने (Maharashtra Government) रेल्वे बोर्डाला लिहिले आहे. यापूर्वी दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांना केवळ मासिक पास मिळत होता. मात्र, आता लोकलचं दैनंदिन तिकीट नागरिकांना मिळणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच यापूर्वी लोकल ट्रेनने प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. त्यानतंर 15 ऑगस्टपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिली. मात्र, त्यांना तिकीटाऐवजी मासिक पास घ्यावा लागत होता. पण आता राज्य सरकारने दोन्ही डोस घेतलेल्या नागिरकांना दैनंदिन तिकीट मिळावे यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने रेल्वेला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी रेल्वे स्थानकावर तैनात करावेत. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरीकच पास किंवा तिकीट घेत आहेत का याबाबतची तबपासणी करावी. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 100 टक्के लोकल फेऱ्या 28 ऑक्टोबर 2021 पासून मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेवर (Western Railway) लोकलच्या 100 टक्के फेऱ्या चालवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शासनाने निवडलेल्या श्रेणींनाच एसओपीनुसार प्रवास करण्याची परवानगी आहे. उपनगरीय ट्रेनमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, आता 28 ऑक्टोबर 2021 पासून, मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवा प्री-कोविड स्तरावर म्हणजेच मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात 100% चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 22 मार्च 2020 पासून कोविड-19 लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. नंतर 15 जून 2020 पासून, रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणींसाठी उपनगरीय सेवा सुरू केल्या. उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या प्रवाशांच्या श्रेणी, नंतर ऑगस्ट 2021 मध्ये आणि अलीकडच्या आठवड्यात वाढवण्यात आल्या. सध्या, मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वे अनुक्रमे मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात 1702 आणि 1304 उपनगरीय सेवा चालवत आहेत, ज्या त्यांच्या एकूण उपनगरीय सेवांच्या 95.70 % आहे. आता 28 ऑक्टोबर 2021 पासून, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागात प्री-कोविड स्तरावर 100% उपनगरीय सेवा म्हणजेच मध्य रेल्वेवर 1774 आणि पश्चिम रेल्वेवर 1367 सेवा चालवण्यात येत आहेत. फक्त राज्य सरकारने निवडलेल्या श्रेणी आणि त्यांनी जाहीर केलेल्या SOP नुसार प्रवास करण्याची परवानगी आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Corona vaccine, Mumbai, Mumbai local

    पुढील बातम्या