Home /News /mumbai /

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झोपण्यासाठी प्रवाशानं अफलातून जुगाड, Photo तुफान Viral

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झोपण्यासाठी प्रवाशानं अफलातून जुगाड, Photo तुफान Viral

 प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local Train) मुंबईची लाईफलाईन म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. या लोकलचं महत्त्व मुंबईकरांसाठी ऑक्सिजनपेक्षा कमी नाही असं म्हटलं तरीही चालू शकतं.

मुंबई, 20 एप्रिल: मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local Train) मुंबईची लाईफलाईन म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. या लोकलचं महत्त्व मुंबईकरांसाठी ऑक्सिजनपेक्षा कमी नाही असं म्हटलं तरीही चालू शकतं. इथल्या शेळ्या-मेंढ्यांसारख्या खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनची मुंबईकरांना चांगलीच सवय आहे. जिथे पाय ठेवायला जागा नाही तिथे कुणी झोपण्यासाठी जुगाड केला तर ते आश्चर्यापेक्षा कमी नक्कीच नाही. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झोपलेल्या अशाच एका व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत तो गाढ झोपेत असल्याचं दिसतंय. एकदा का झोप आली की मग झोपण्यासाठी कोणी जागा, पलंग शोधत बसत नाही. त्याला जिथे मान टाकायला जागा मिळाली तिच त्याची बेडरूम बनते. अगदी बसल्याबसल्या सोफ्यावर किंवा प्रवासात, गर्दीत शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खांद्यावर मान टाकून अनेक प्रवासी झोपतात. असाच मुंबई लोकल ट्रेनमध्ये गाढ झोपेत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. ज्या ठिकाणी लोकल ट्रेनमधील प्रवासी आपलं सामान म्हणजेच बॅग ठेवतात. तिथं एक माणूस झोपलेला या फोटोत दिसतोय. या माणसाने जीन्स आणि टी-शर्ट घातलेला आहे. डोळे शर्ट आणि निळ्या कपड्याने झाकलेले आहेत. तो एकदम सरळ त्या सामान ठेवण्याच्या रॅकमध्येच झोपलाय. हा फोटो पाहिला की सामानाच्या रॅकवर झोपणं हीदेखील एक कला आहे, असं वाटू लागतं. या व्यक्तीला असं सामानाच्या रॅकमध्ये झोपलेलं पाहून प्रवाशांना धक्का बसला. अनोखी परंपरा; यात्रेत अविवाहित तरुणांना महिला मारतात काठीनं फटका, हे आहे कारण मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा फोटो रेडिटवर u/Radiant_Commercial56 नावाच्या यूजरने शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, मी खरं सांगतोय की, मला याला पाहून थोडा हेवा नक्कीच वाटतोय! दरम्यान, दोन दिवसांत हा फोटो सोशल मीडियावर (Photo Viral on Social Media) तूफान व्हायरल झालाय. या फोटोला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. तर, सामानाच्या रॅकवर झोपलेल्या या व्यक्तीला पाहून मुंबईकर देखील गोंधळले आहेत. गर्दीने खचाखच भरलेल्या लोकमध्ये त्याने झोपण्यासाठी जी कल्पना वापरली ती खरंच भन्नाट आहे. दरम्यान, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर तो सामानाच्या छोट्याशा रॅकमध्ये कसा झोपला असा प्रश्न नेटकरी विचारत आहे. त्या पेक्षाही महत्वाचं म्हणजे, तो त्या रॅकपर्यंत चढलाच कसा, हे जाणून घेण्याची उत्सुकता नेटकऱ्यांमध्ये दिसतीये. पाय ठेवायलाही जागा नसणाऱ्या लोकलमध्ये गर्दी आणि दुनियादारीची फिकीर न करता गाढ झोपलेल्या या प्रवाशाचा फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Mumbai local, Photo viral

पुढील बातम्या