प्रवाशांनी कृपया लक्ष असू द्या! रेल्वे रुळ ओलांडल्यास येणार यमराज

मुंबईतील रेल्वे स्थानकात खुद्द यम अवतरल्यानं खळबळ.

News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2019 12:40 PM IST

प्रवाशांनी कृपया लक्ष असू द्या! रेल्वे रुळ ओलांडल्यास येणार यमराज

मुंबई, 08 नोव्हेंबर: रेल्वे रुळ ओलांडू नये यासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही अनेकवेळा लोकल येण्याआधी रुळ ओलांडून जाताना नागरिक दिसतात. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रेल्वेनं अनोखी मोहीम राबवली आहे. मुंबईतल्या रेल्व स्थानकात चक्क यम अवतले आहेत. यम अनेकांना त्यांच्या खांद्यावर उचलून घेऊन जाताहेत. कलयुगात खुद्द यम मुंबईत आल्यानं खळबळ उडाल.

मुंबईत अवतरलेले यम चक्क जीवंत प्रवाशांना उचलून नेत आहेत. आता हेच पाहा रेल्वे लाईन म्हणजेच ट्रॅक क्रॉस करू नका ही अनाऊन्समेंट होत असतानाच दोन विद्यार्थ्यांनी ट्रॅक क्रॉस केला. आणि त्याच वेळी यमराज आले आणि त्यांनी ट्रॅक क्रॉस करणाऱ्या एका विद्यार्थ्याला उचलून घेतलं. रेल्वे ट्रॅक करणं हे मृत्यूला आमंत्रणच आहे. त्यामुळे खुद्द यमराजांनीच ट्रॅक क्रॉस करणाऱ्याला उचलून नेलं. रेल्वे ट्रॅक क्रॉस करणाऱ्या लाल शर्ट परिधान केलेल्या युवकालाही यमानं उचलून नेलं. तिसऱ्या एका घटनेत एकानं यमासमोर कान धरले तर यमाने दुसऱ्याला उचलण्याचा प्रयत्न केला. दोन रेल्वे ट्रॅकच्या मधोमध पडलेल्या एकालाही यमानं उचलून नेलं. हा यम प्रवाशांना नरकात घेऊन जात नाही. तर हा यम रेल्वे प्रवाशांचं प्रबोधन करतो. प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना रेल्वे ट्रॅक क्रॉस करू नका असा संदेश यम देतोय. लोकलच्या डब्यात जाऊनही यमराज प्रवाशांना सुरक्षित प्रवास करण्याच्या सुचना देतात. प्रवाशांच्या जनजागृतीसाठी रेल्वेचं एनजीओच्या मदतीनं प्रबोधन केलं जातंय. ज्या भागात ट्रॅक ओलांडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत तिथं मोठ्या प्रमाणात यमराज प्रबोधन करताना दिसत आहेत.

मुंबईत ट्रॅक क्रॉस करताना अनेकांनी जीव गमावलाय. 2015 मध्ये 3304 प्रवाशांनी ट्रॅक क्रॉस करताना जीव गमावला. 2016 मध्ये 3202, 2017 मध्ये 3014 तर 2018 मध्ये 2981 प्रवाशांनी जीव गमावलाय. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून ट्रॅक क्रॉस करण्याविरोधात प्रबोधन केलं जात आहे. प्रवाशांनीही काही मिनिटं वाचवण्याच्या नादात मोलाचा जीव गमावू नये, हे ही तितकंच महत्त्वाचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 12:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...