सीएसएमटी स्टेशनवर लोकल बफरवर धडकली, मोठी दुर्घटना होता-होता टळली

सीएसएमटी स्टेशनवर लोकल बफरवर धडकली, मोठी दुर्घटना होता-होता टळली

सीएसएमटी स्टेशनवर लोकलचा अपघात झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 एप्रिल : सीएसएमटी स्टेशनवर लोकलचा मोठा अपघात होता-होता टळला आहे. सीएसएमटी स्टेशनवर हार्बर मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आलेली लोकल बफर एण्डवर धडकली.  यामुळे  लोकस सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती. लोकलचं देखील काही प्रमाणात नुकसानझालं आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

चर्चगेट स्थानकातही झाला होता असाच अपघात

2015मध्ये देखील पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट स्थानकात अशाच प्रकाराचा अपघात झाला होता. भाईंदरहून चर्चगेटच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर आलेली लोकल बफरवर आदळून थेट प्लॅटफॉर्मवर चढली होती. यावेळेस लोकल वेगात असल्यानं पहिला डबा प्लॅटफॉर्मवरच चढला होता. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. पण काही प्रवासी जखमी झाले होते. या प्रकरणी  मोटरमनसह गार्ड आणि लोको इन्स्पेक्टरयांना सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं.

वाचा अन्य बातम्या

VIDEO: अर्जदाखल करण्याआधी नरेंद्र मोदींनी घेतलं कालभैरवाचं दर्शन

VIDEO: टीका-टिप्पणी विसरुन अमित शहा-उद्धव ठाकरे एकत्र येतात तेव्हा...

VIDEO: कालभैरवाच्या दर्शनानंतर वाराणसीमधून मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल

SPECIAL REPORT: 'या' कारणामुळे राहुल गांधी मुंबईत रोड शोसाठी आले नाहीत?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 12:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading