Home /News /mumbai /

बाजीगर! महिलेचा जीव वाचवण्यासाठी रुळावर उतरला CRPF जवान, समोर येत होती लोकल आणि...

बाजीगर! महिलेचा जीव वाचवण्यासाठी रुळावर उतरला CRPF जवान, समोर येत होती लोकल आणि...

सीआरपीएफ जवान श्याम सूरत यांनी तातडीनं रुळावर उतरून या महिलेला फलाटावर घेण्याचा प्रयत्न केला.

    मुंबई, 11 डिसेंबर : अनेकवेळा धावत्या लोकलमधून उतरताना किंवा चढताना अपघात होत असल्याचे व्हिडीओ समोर येत असतात. तोल जाऊन फलाटावरून थेट रेल्वे रुळावर कोसळणाऱ्या महिलेचे प्राण एका CRPF जवानानं वाचवले आहेत. समोरून लोकल येत असताना अचानक तोल जाऊन महिला फलाटावरून रुळावर कोसळली आणि मोठा दुर्घटना एका सीआरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे टळली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सॅन्टहस रोड स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर महिला चालत असताना अचनक तिचा तोल गेला आणि लोकलच्या रेल्वे रुळावर कोसळली. चक्कर आल्यामुळे 23 वर्षीय अनीशा शेख खाली पडली. त्याचवेळी समोरून लोकलचा आवाज आला. तिथे उपस्थित असलेल्या CRPF जवानानं लगेच सतर्कता दाखवत महिलेला फलाटावर आणण्याचा प्रयत्न केला. हे वाचा-होऊ दे खर्च! सूनेची इच्छा पूर्ण करण्यासाठी सासऱ्यानं मागवलं हेलिकॉप्टर सीआरपीएफ जवान श्याम सूरत यांनी तातडीनं रुळावर उतरून या महिलेला फलाटावर घेण्याचा प्रयत्न केला. तर फलाटावर जमलेल्या लोकांनी लोकलला हात दाखवून थांबण्यास सांगितलं. सुदैवानं लोकल थांबली आणि सीआरपीएफ जवानाला तरुणीचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे. सीआरपीएफ जवान आणि लोकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेला भोवळ आल्यामुळे ती खाली कोसळली. त्यामुळे ही घटना घडली आहे. मुंबईतील सैंडहर्स्ट रोड परिसरात ही घटना घडली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या