गर्दीमुळे 3 प्रवासी रेल्वे रुळावर पडले, एकाचा मृत्यू

गर्दीमुळे 3 प्रवासी रेल्वे रुळावर पडले, एकाचा मृत्यू

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : काल रात्री मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमधून 3 प्रवासी खाली पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला आणि 2 गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सायनच्या टिळक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे सध्या रेल्वे परिसरात खळबळ उडाली आहे.

काल रात्री 10 वाजेच्या सुमारास सायन ते कुर्ला स्थानकाच्या मध्ये रेल्वे रुळावर धावत्या लोकलमधून हे 3 प्रवासी रेल्वे रुळावर पडले. हे प्रवासी खाली पडल्यची माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफ यांना मिळाली. त्यांनी तात्काळ या तिघांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

रेल्वे रुळावर शोध घेत असताना ते तिघे जण रुळावर पडलेले दिसले. त्यांना रुळावरून ताबडतोब बाहेर काढण्यात आलं आणि घाटकोपर येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान, या प्रवाशांंमधील एकाचा मृत्यू झाला.

जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी सायनच्या टिळक रुग्णलयात नेण्यात आलं. जास्त गर्दी असल्याने हे प्रवाशी रुळावर पडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रवाशांची माहिती पोलिसांना मिळाली नसल्याने त्यांची नाव अद्याप कळू शकलेली नाही.

 

‘हिट मॅन’ ते ‘बेस्ट कॅप्टन’, असा आहे रोहित शर्माचा प्रवास

 

First published: September 19, 2018, 8:31 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading