मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईची लोकल होणार सुरू? मुख्यमंत्री ठाकरे आज 1 वाजता साधणार संवाद

मुंबईची लोकल होणार सुरू? मुख्यमंत्री ठाकरे आज 1 वाजता साधणार संवाद

राज्यात कोरोनाची लाट आता ओसरत चालेली आहे. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लोकलची सुविधा पुन्हा एकदा सुरू करण्यात यावेळी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 20 डिसेंबर : गेल्या नऊ महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा  (mumbai Local) कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्वसामान्यांसाठी बंदच आहे.  राज्यातील सर्वच बाजारपेठा आणि उद्योग धंदे सुरू झाल्यामुळे लोकल सेवा कधी सुरू होणार याची प्रतिक्षा लागून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) आज जनतेशी संवाद साधणार आहे, यावेळी ते लोकल सुरू करण्याची घोषणा करता का हे पाहण्याचे ठरणार आहे. राज्यात कोरोनाची लाट आता ओसरत चालेली आहे. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लोकलची सुविधा पुन्हा एकदा सुरू करण्यात यावेळी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. परंतु, अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल सध्या सुरू आहे. हिवाळी अधिवेशनात सुद्धा लोकल सुरू करण्याबाबत सवाल उपस्थितीत झाला होता. मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 1 जानेवारीपासून लोकल सेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते. आज दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी मुख्यमंत्री लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. लोकल सेवा सुरू झाल्यानंतर मुंबई पूर्वपदावर येईल, त्यामुळे सर्व कार्यालय आणि उद्योगधंद्यांना चालना मिळेल. सध्या लोकल सेवा ही फक्त अत्यावश्यक सेवेसाठी चालवली जात आहे. त्यामुळे गेल्या 9 महिन्यांपासून लोकलचे दार सर्वसामान्यांसाठी बंदच आहे. त्याचबरोबर कोरोनावर अखेर लस उपलब्ध झाली आहे.  राज्यात कोरोना लशीचे कसे वितरण होणार याबद्दल तयारी सुरू आहे असून  लशीचे वितरण करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री कोरोनाच्या लशीच्या वितरणाबद्दल काय माहिती देता हे ही पाहण्याचे ठरणार आहे.
First published:

पुढील बातम्या