मुंबई, 24 नोव्हेंबर: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध कामांनिमित्त मध्य रेल्वे जम्बो मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे उद्या मेगा हाल होऊ शकतात. रविवारी बाहेर पडताना लोकलचं वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेवर सकाळी 10.30 ते दुपारी 3.00 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरून वळवण्यात येईल.
हार्बरमार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रा इथे सकाळी 11.40 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनेवलसाठी जाणाऱ्या लोकल ब्लॉक दरम्यान रद्द केल्या जाणार आहेत.
Mega Block on 24.11.2019
Matunga-Mulund Dn fast line from 10.30 am to 3.00 pm; CSMT-Chunabhatti/Bandra Dn harbour line from 11.40 am to 4.10 pm and Chunabhatti/Bandra CSMT Up harbour line from 11.10 am to 3.40 pm. pic.twitter.com/2iq2BDJAb5
— Central Railway (@Central_Railway) November 23, 2019
पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव 10.35 ते दुपारी 03.35 मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन मार्गावर दोन्ही दिशेनं लोकल सेवा खंडित राहणार आहे. सिग्नल, रुळ, ओवरहेड वायर यांसारख्या तांत्रिक कामांसाठी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. शनिवारी आणि रविवारी रात्री कुर्ला स्थानकात मध्यरात्रीपासून पहाटे 5 पर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा