पावसाची विश्रांती; पण लोकल अजूनही उशीरानेच

पावसाची विश्रांती; पण लोकल अजूनही उशीरानेच

  • Share this:

मुंबई,31 ऑगस्ट:  मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी अजूनही  रेल्वे वाहतूक पूर्णपणे ट्रॅकवर आलेली नाही. मुंबईच्या तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक उशिराने सुरू आहे.

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तिन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर बुधवार दुपारपर्यंत जवळपास सर्व मार्गांवरील रेल्वे वाहतूक सुरू झाली होती. पण अजूनही मध्य रेल्वची वाहतूक 15 मिनिटं उशीराने सुरू आहे. पश्चिम रेल्वे 10- 15 मिनिटं उशीराने धावत आहेत तर हार्बर रेल्वे मात्र एक तास उशिराने धावत आहे.

दुसरीकडे दुरांतोच्या अपघाताने विस्कळीत झालेली आसनगाव- वाशिंद मार्गावरची वाहतूक अजूनही पूर्वपदावर आलेला नाही. आसनगावकडून-वाशिंदकडे येणारी 'अप' मार्गावरील रेल्वे वाहतूक अजूनही ठप्प आहे. तर वाशिंदकडून आसनगावकडे जाणारी डाऊन दिशेवरील वाहतूक चालू आहे. कसारा टिटवाळा लाईनवरच्या 2 ट्रॅकपैकी एक ट्रॅक चालू पण लोकल सेवा मात्र अजूनही बंद आहे.

First published: August 31, 2017, 8:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading