मुंबई, 21 ऑक्टोबर : नवरात्रीच्या उत्सवाचे निमित्त साधून अखेर मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. ठराविक वेळेत महिलांना लोकलने प्रवास करता येणार आहे. पण, आता नुसता प्रवासच नाहीतर रेल्वेच्या पासमध्येही सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले लोकलचे दार आता महिलांसाठी खुले झाले आहे. राज्य सरकारने पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनीही हिरवा कंदील दिला आहे. त्याचबरोबर रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिलांना रेल्वेच्या पासमध्ये सवलत देण्यात आली आहे.
तासाभरात एकनाथ खडसे परतले भाजपमध्ये, मोदींवर निशाणा साधला खरा पण...
ज्या महिलांचा रेल्वे प्रवासाचा पास हा 22 मार्चनंतर संपला होता, अशांना ते दिवस भरून मिळणार आहे. 23 मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा झाली होती. त्यामुळे लोकल सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे अनेक जणांचे महिना, सहामहिने अथवा वर्षभराचा पास वाया गेला होता. पण, आता वैध असलेल्या पासमधील 22 मार्चनंतर शिल्लक असलेले दिवस भरून मिळणार आहे. त्यामुळे आजपासून लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांना आज मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत तिन्ही मार्गावर सर्व महिला प्रवाशांना सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान व सायंकाळी 7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने पत्रव्यवहार केल्यानंतर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी घोषणा केली आहे.
बापरे! घरं गेली पाण्यात आणि मासे आले दारात, पाहा हा VIDEO
दरम्यान, आज एसटी किंवा बेस्टच्या बसेसने मुंबईत किंवा उपनगरात कार्यालय गाठणाऱ्या महिलांची संख्या कमी दिसून येत आहे. ज्यांची कार्यालय उघडण्याची वेळ सकाळी 11 च्या अगोदर आहे. त्यांच्यासाठी कार्यालयाच्या वेळ बदला किंवा सकाळपासून लोकलची सुविधा उपलब्ध करा अशी मागणी आता महिला प्रवासी वर्ग करत आहे. कार्यलयाच्या वेळा जर महिलांसाठी दोन शिफ्टमध्ये करा किंवा लोकलची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.