Home /News /mumbai /

मुंबई लोकलमध्ये Gas Attack च्या षडयंत्राचा खुलासा, रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त वाढवला

मुंबई लोकलमध्ये Gas Attack च्या षडयंत्राचा खुलासा, रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त वाढवला

मुंबई लोकलमध्ये विषारी वायू (gas attacks) सोडून घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली.

  मुंबई, 18 सप्टेंबर: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) विविध ठिकाणांहून सहा दहशतवाद्यांना अटक (six terrorist arrest by Delhi Police) केल्यानंतर आज पुन्हा महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) मोठी कारवाई केली. आज सकाळी महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर मुंबई लोकलमध्ये विषारी वायू (gas attacks) सोडून घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर आता रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले दहशतवादी इतर ठिकाणांव्यतिरिक्त मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये स्फोट घडवण्याचा कट आखत होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याविषयी गुप्तचर माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे दहशतवाद्यांनी लोकल ट्रेनवर गॅस हल्ला किंवा गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकावर भरधाव गाडी घुसवून प्रवाशांना चिरडण्याचं षडयंत्र आखलं आहे. अफगाणिस्तानबाबत भारताची भूमिका काय?, पंतप्रधान मोदींनी केलं स्पष्ट  रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त वाढवला समोर आलेल्या माहितीनंतर रेल्वे पोलीस सतर्क झाली आहे. मुंबई लोकल (Mumbai Local) आणि स्टेशनवर सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसरात काहीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ तपासणी करण्याचेआदेश देण्यात आलेत. मोठी बातमी: विसर्जनादरम्यान 7 मुली बुडाल्या, तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू तसंच रेल्वे स्टेशनवरील मुख्य प्रवेशद्वार सोडून सर्व गेट बंद करण्यात आले आहेत. मुंबई लोकल रेल्वेमध्ये विषारी वायू हल्ला करण्याचं दहशतवाद्यांचं षडयंत्राची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे आदेश दिले आहेत. टीव्ही 9 हिंदीनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. तसंच रेल्वे पोलिसांना (GRP) विविध एजन्सींकडून नवीन धमक्या येत असून त्याआधारे ही माहिती मिळाली आहे. रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद म्हणाले, ''आम्हाला वारंवार दहशतवादाच्या धमक्या येत आहेत. विशेषत: लोकल ट्रेनसाठी आलेली धमकी तसंच आम्ही प्रत्येक धमकी गंभीरपणे घेतली गेली आहे. आम्ही आलेल्या धमक्यांवर विशेष लक्ष देऊन विविध पावले उचलत आहोत.'' पंजाब काँग्रेसमध्ये भूकंप, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह राजीनामा देणार? दहशतवादांकडून मुंबई लोकलची रेखी दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी पार पडलेल्या बैठकीत अतिरिक्त सुरक्षा वाढवण्याचं ठरवण्यात आलं आहे. सुरक्षेसाठी एक मॉडल तयार करण्याक येणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. अनेक ठिकाणांची रेकी गेल्या महिन्याभरापासून हे ऑपरेशन सुरू होतं. 6 दहशतवाद्यांपैकी मुंबईतून एका जणाला अटक करण्यात आली होती. ऐन सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युपीमध्ये IED ब्लास्ट करण्याचा कट होता. धक्कादायक म्हणजे या दहशतवाद्यांनी मुंबई लोकलचीही रेकी केली होती. तसंच घातपात घडवण्यासाठी त्यांनी राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन रेकी केल्याचंही समजतंय.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Mumbai local, Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या