मुंबई : रेल्वे स्टेशनवरील 'एस्क्लेटर'च्या किंमतीत असाही 'चढउतार' !

मुंबई : रेल्वे स्टेशनवरील 'एस्क्लेटर'च्या किंमतीत असाही 'चढउतार' !

वेस्टर्न रेल्वेच्या सरकत्या जिन्यांची किंमत इथं फार जास्त जाणवतेय. तर मध्य रेल्वेचे काही सरकते जिने जसं कांजुरमार्ग, विक्रोळी, भांडुप यांच्या किंतीही जास्तच जाणवतायत. प्रश्न निर्माण होतो की एस्केलेटरमध्ये अशी काय विविधता असेल की किंमती या दुप्पट झाल्यात.

  • Share this:

उदय जाधव, मुंबई

16 मे : रेल्वे प्रवाश्यांना सुविधा देण्यासाठी, मुंबईतल्या अनेक रेल्वे स्टेशनवर एस्क्लेटर बसविण्यात आलेत. ज्याचं आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आलं. पण या एक्स्लेटर बांधण्यासाठी झालेल्या व्यवहारांत, मोठी तफावत दिसून आलीय. यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात ही खर्चिक तफावत उघड केलीय.

सरकते जिने फक्त दिव्यांगच किंवा वयोवृद्ध नाही तर थकलेल्या प्रवाशाला थोडं का होईना पण चालण्याचा त्रास नक्की कमी करत. स्मार्ट स्टेशनअंतर्गत ज्या सुविधा पुरवल्या जातायत त्याचाच हा भाग आहे. पण यात खटकणारी गोष्ट म्हणजे या एस्केलेटरची किंमत...पश्चिम आणि मध्य रेल्वेर जे एस्केलेटर लावले गेले आहे त्यांच्या किंमतीतील तफावत माहितीच्या अधिकारात उघड करण्यात आलीय. मध्य रेल्वेच्या आणि पश्चिम रेल्वेच्या सरकत्या जिन्यांच्या किंमतीतील तफावत विचार करायला लावणारी आहे.

सरकत्या जिन्यांच्या किंमती (प्रति)

मध्य रेल्वे                 

कमीत कमी किंमत- 54 लाख, 73 हजार

जास्तीत जास्त किंमत -77 लाख 48 हजार

पश्चिम रेल्वे

कमीत कमी किंमत--72 लाख 28 हजार

जास्तीत जास्त किंमत-- 1 कोटी 8 लाख

वेस्टर्न रेल्वेच्या सरकत्या जिन्यांची किंमत इथं फार जास्त जाणवतेय. तर मध्य रेल्वेचे काही सरकते जिने जसं कांजुरमार्ग, विक्रोळी, भांडुप यांच्या किंतीही जास्तच जाणवतायत. प्रश्न निर्माण होतो की एस्केलेटरमध्ये अशी काय विविधता असेल की किंमती या दुप्पट झाल्यात.

स्मार्ट स्टेशनवर बसवणाऱ्या या सुविधा जर रेल्वेचा किंबहुना प्रवाशांचा असा पैसा वाया घालवत असतील तर या प्रक्रीयेची चौकशी होणं गरजेचं आहे.

पश्चिम रेल्वच्या स्टेशन्सवर एकूण 34 तर मध्य रेल्वेच्या रेल्वे स्टेशन्सवर सरकते जिने लावले गेले आहेत.मध्य रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार सरकत्या जिन्यांची लांबी रुंदी यांवर किंमत ठरत असते सरसकट सगळेच सरकते जिने हे एका किमतीचे असु शकत नाहीत. पण तरीही किंमती दप्पटीत कशा वाढल्याच याची एकदा पश्चिम रेल्वे प्रशासनानं चौकशी करणं गरजेचं आहे.

First published: May 16, 2017, 10:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading