मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; मुंबईकरांची उडणार धांदल

Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; मुंबईकरांची उडणार धांदल

Mumbai Local Mega Block: रविवारी 14 मार्च रोजी मध्य रेल्वे (Madhya Railway) आणि मुंबई विभागात (Mumbai Region) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Local Mega Block: रविवारी 14 मार्च रोजी मध्य रेल्वे (Madhya Railway) आणि मुंबई विभागात (Mumbai Region) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Local Mega Block: रविवारी 14 मार्च रोजी मध्य रेल्वे (Madhya Railway) आणि मुंबई विभागात (Mumbai Region) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 12 मार्च: रविवार दिनांक 14 मार्च रोजी मध्य रेल्वे (Central Railway) आणि मुंबई विभागात (Mumbai Region) मेगा ब्लॉकची घोषणा (mumbai local Mega Block) करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी मुंबईकरांना प्रवासासाठी विविध अडचणी येणार आहेत. हा मेगा ब्लॉक सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. त्यानंतर संबंधित रेल्वेसेवा सुरळीत करण्यात येणार आहे.

हा मेगा ब्लॉक केवळ मध्य रेल्वे आणि मुंबई विभागावर लागू केला आहे. याचा मेन लाईनवर कोणताही परिणाम होणार नाही. मेन लाईनवरील रेल्वेसेवा नेहमीप्रमाणे सुरळीत राहिलं. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या जनसंपर्क विभागाने परिपत्रक काढून संबंधित माहिती दिली आहे.

रविवारी 14 मार्च रोजी मध्य रेल्वे आणि मुंबई विभागात मेगा ब्लॉक चालवला जाणार आहे. रेल्वेच्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हार्बर आणि ट्रान्स हार्बर विभागात मेगा ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. हार्बर लाइनवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत कुर्ला ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्ग बंद राहणार आहेत. त्यामुळे या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात अडचणी येण्याची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 03.39 दरम्यान वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सकाळी 10.21 ते दुपारी 03.41 दरम्यान सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा बंद राहणार आहे. असं असलं तरी मेगा ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल विभागा दरम्यान काही विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.

हे ही वाचा-Lockdown मुंबईच्या उंबरठ्यावर; या शहरात Night curfew

याव्यतिरिक्त ट्रान्सहार्बर लाइनवर ठाणे ते वाशी / नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 04.10 या वेळेत मेगा ब्लॉक लावण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे येथून सकाळी 10.35  ते सायंकाळी 4.19 दरम्यान वाशी, नेरुळ आणि पनवेलसाठी सुटणाऱ्या गाड्या आणि सकाळी 10.12 ते सायंकाळी 04.09 या वेळेत पनवेल, नेरूळ आणि वाशी येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या अप सेवा बंद राहणार आहे. पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने हा मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावं, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.

First published:

Tags: Mumbai local