Home /News /mumbai /

FACT CHECK: लोकल, मेल आणि एक्सप्रेस सेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार?

FACT CHECK: लोकल, मेल आणि एक्सप्रेस सेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार?

मुंबईतली लोकल सेवा केव्हा सुरु होणार असा प्रश्न कायम विचारला जात असतो. गेल्या काही महिन्यांपासून ही सेवा बंद आहे.

मुंबई 10 ऑगस्ट: कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मुंबईतली लोकल सेवा, मेल आणि एक्सप्रेस सेवा काही महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आली होती. त्याला 30 ऑगस्टपर्यंत मुदतवाढही देण्यात आली होती. ही मुदत आणखी वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याच्या बातम्या येत आहेत. तर सोशल मीडियावरही त्यावर अनेक बातम्या आल्या आहेत. मात्र असा कुठलाही आदेश काढला नसल्याचा खुलासा  रेल्वेने केला आहे. त्यामुळे सध्या आहे तीच परिस्थिती कायम राहिल असं स्पष्ट झालं आहे. फक्त अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठीच मर्यादीत स्वरुपात ही सेवा सध्या सुरु आहे आणि ती तशीच कायम राहणार आहे. राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यापर्यंत अनलॉकची स्थिती असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे त्यानंतरच काही निर्णय होण्याची शक्यता  आहे. लोकलमधली गर्दी बघता काय निर्णय घ्यावा याबाबत राज्य सकार संभ्रमात आहे. कारण अजुनही कोरोनाची स्थिती आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे लोकल सेवा सुरु झाली तर गर्दीवरही नियंत्रण ठेवणं कठीण जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय हा काळजीपूर्वकच घ्यावा लागेल असं मत सरकारी सूत्रांनी सांगितलं. दरम्यान,  13 ते 21 ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. वाद चिघळणार! सुशांतचा भाऊ ठोकणार संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा मात्र, सदर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड - 19  ची चाचणी  (RT- PCR Swab Test )  करणे अनिवार्य असून सदर चाचणी निगेटिव्ह (नकारात्मक ) असल्यास संबंधितांना प्रवास करता येईल, अशी अट ठेवण्यात आली आहे. यासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकावर बसेस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. निधन झालेल्या वडिलांना एकदा पाहू द्या! मुलगा विनवणी करत होता, मागितले 51 हजार ई पास नको, पण कोविड टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणा असा आदेश महामंडळाने काढला आहे. त्यामुळे कोविड-19 च्या टेस्टसाठी चाकरमान्यांना अडीच हजार मोजावे लागणार आहेत. एकंदरीत कोकणात जाणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे, असा आरोप एसटी महामंडळाच्या या निर्णयानंतर केला जात आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Indian railway

पुढील बातम्या