मुंबई Local संदर्भात मोठा निर्णय : QR कोडशिवाय महिलांना करता येईल लोकल प्रवास

मुंबई Local संदर्भात मोठा निर्णय : QR कोडशिवाय महिलांना करता येईल लोकल प्रवास

सकाळी मात्र लोकल मध्ये महिला प्रवास करता येणार नाही. प्रवासासाठी क्यूआर कोडची गरज नाही. सर्वच महिलांना लोकल प्रवास करता येईल.

  • Share this:

मुंबई 16 ऑक्टोबर: मुंबईतल्या महिला प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. महिलांना शनिवारपासून लोकल प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने या संदर्भात पत्रक काढलं आहे. या संदर्भात राज्य सरकारने रेल्वे विभागाला पत्र पाठवलं आहे. त्यात महिलांना प्रवासाची मुभा द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. पत्रात दिलेल्या माहितीनुसार  सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 7 नंतर शेवटच्या लोकल पर्यंत प्रवास करता येईल. सकाळी मात्र लोकल मध्ये महिला प्रवास करता येणार नाही असंही त्यात म्हटलं आहे. प्रवासासाठी क्यूआर कोडची गरज नाही. सर्वच महिलांना लोकल प्रवास करता येईल. या आधी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

नोकरी करणाऱ्या महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात मागणी करण्यात येत होती. अपुऱ्या लोकलच्या फेऱ्या आणि रस्त्यावरची वाहतूक कोंडी यामुळे महिलांना कामावर जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. जाण्या येण्यातच त्यांचे अनेक तास वाया जात असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत होता.

या निर्णयामुळे आता महिलांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस असल्याने रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. वाहतुकीचा सगळा भार हा रस्त्यांवर आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे काम कसं करायचं असा प्रश्न विचारला जात होता.

घटस्थापनेच्या मुहूर्तावरच सरकारने ही घोषणा केल्याने आता महिलांसाठी वाहतुकीचा त्रास वाचणार आहे. कोरोनाचा धोका टळला नसल्याने गर्दीच्या वेळी प्रवासाची मुभा देण्यात आली नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे आता ऑफिसमधली उपस्थितीही वाढली आहे.

तब्बल 2 कोटी किंमतीचे विकणार होता ड्रग्स, मुंबई पोलिसांना खबर लागली आणि...

उपनगरांमधून मोठ्या प्रमाणावर महिला नोकरीनिमित्त मुंबईत येत असतात. त्यांचा आता हाल अपेष्टांमधून काहीशी सुटका होणार आहे. मात्र प्रवास करताना सुरक्षेचे सर्व नियम पाळण्याचं आवाहन सरकारने केले आहे. मास्क आणि सोशल डिस्टसिंगचा वापर कटाक्षाने करा असं आवाहन सरकार सातत्याने करत आहे. ते नियम पाळले तर प्रवास सुरक्षित होईल आणि कोरोनाला अटकाव करता येईल असंही सरकारने म्हटलं आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 16, 2020, 5:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या