मुंबई, 13 मे : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवा-कोपर यादरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबई सीएसएमटी स्थानकाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून लोकल जवळपास अर्धा तास उशिराने धावत आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमाण्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहेत. तसंच कल्याण, डोंबिवली या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
कामानिमित्त सकाळी मोठ्या प्रमाणात मुंबईकर बाहेर पडत असतात. पण या महत्त्वाच्या वेळेतच लोकल वाहतुकीला विलंब होत असल्याने प्रवाशांना कामावर जाण्यास उशीर होणार आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी किती वेळ लागेल, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा अवलंब करावा लागत आहे.
SPECIAL REPORT: आग लागली तेव्हा घर आतूनही बंद होतं, श्रावणीच्या मृत्यूमागंचं सत्य काय?