Corona काळात मुंबईत गर्दीचा कहर! लोकलचा VIDEO VIRAL झाल्यानंतर रेल्वेनं दिलं उत्तर

Corona काळात मुंबईत गर्दीचा कहर! लोकलचा VIDEO VIRAL झाल्यानंतर रेल्वेनं दिलं उत्तर

सोशल डिस्टन्सिंगच्या सगळ्या नियमांचा फज्जा उडवत जीवावर उदार होऊन मुंबईकर या प्रचंड भरलेल्या लोकलमध्ये स्वार होताना या VIDEO मध्ये दिसतील. काय होतं या गर्दीचं कारण?

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : एकीकडे Coroanvirus ला आळा घालण्यासाठी जमावबंदी, मास्क, सोशल डिस्टन्सिंग वगैरे पाळा, असे सातत्याने नियम केले जातात, पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे, हे मुंबईतल्या लोकलला झालेल्या गर्दीवरून लक्षात येईल. सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडालेला दिसेल. पण जीवघेण्या गर्दीत एक जरी लक्षणं नसलेला कोरोनाग्रस्त असला तर काय होईल याचा विचार केल्यावर अंगावर काटा येईल. Corona काळातील लोकल गर्दीचा एक VIDEO व्हायरल झाल्यानंतर पश्चिम रेल्वेकडून त्यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

लोकलमध्ये एवढी गर्दी होऊच कशी दिली आणि एकीकडे फक्त आवश्यक सेवेतल्या लोकांसाठी लोकल असल्याचं सांगितलं जात असताना एवढी माणसं एका वेळी कशी आली असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यावर पश्चिम रेल्वेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मुंबईतल्या लोकल गर्दीचं कारण शहरातला मुसळधार पाऊस असल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे.

लोकलमधल्या गर्दीचा हा VIDEO बोरिवली स्टेशनचा आहे. लोकलमध्ये एवढी गर्दी होऊच कशी दिली असे प्रश्न उपस्थित झाल्यावर पश्चिम रेल्वेकडून या गर्दीबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 23 सप्टेंबरला मुंबईत झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी जमा झालं होतं. अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्याने चाकरमान्यांची अडचण झाली आणि हेच रेल्वे सेवा पूर्ववत झाल्यानंतरच्या गर्दीचं कारण असल्याचं रेल्वेने म्हटलं आहे.

मुसळधार पाऊस त्यात रेल्वे बंद, रस्त्यावर पाणी अशा अवस्थेत घर किंवा ऑफिस गाठताना मुंबईकरांची दोन दिवस चांगलीच तारांबळ उडाली. Covid परिस्थितीचे नियम माहिती असले, तरी अशा वेळी जीव धोक्यात घालून अनेकांनी अशा भरलेल्या लोकलमधून प्रवास केला.

Coronavirus चा विस्फोट होणं मुंबईसारख्या शहरात किती सोपं आहे हे या VIDEO तून दिसतं. अगतिकता आणि अपरिहार्यता या दोन्हीचं हे उदाहरण म्हणता येईल. गर्दीचं कारण ही अपरिहार्यता आहे की पाऊस की आणखी काही?

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 24, 2020, 8:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading