मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

उपसभापती निवडणुकीत भाजपची खेळी, थेट कोर्टाचे ठोठावले दार, सांगितले 'हे' कारण...

उपसभापती निवडणुकीत भाजपची खेळी, थेट कोर्टाचे ठोठावले दार, सांगितले 'हे' कारण...

कोरोना संकट काळात दोन दिवसाच्या अधिवेशनात काही आमदार अनुउपस्थिती आहे. त्यात निवडणुकींची घाई का?

कोरोना संकट काळात दोन दिवसाच्या अधिवेशनात काही आमदार अनुउपस्थिती आहे. त्यात निवडणुकींची घाई का?

कोरोना संकट काळात दोन दिवसाच्या अधिवेशनात काही आमदार अनुउपस्थिती आहे. त्यात निवडणुकींची घाई का?

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 08 सप्टेंबर : विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची आज निवडणूक होणार आहे. पण या निवडणुकीच्या आधीच वाद पेटला आहे. भाजपने निवडणूक होऊच नये, यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. भाजपचे आमदार गैरहजर असल्यामुळे भाजपने नवी खेळी केली आहे.

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपनेही आपला उमेदवार उतरवला आहे. पण, आता भाजपने ही निवडणूक होऊच नये, यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. भाजपचे काही आमदार हे विधान परिषदेत गैरहजर आहे. 3 आमदार कोरोनामुळे आजारी आहेत. तर 4 आमदार हे पुरामुळे येऊ शकले नाहीत. त्यांना मतदानाचा अधिकार द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. ही निवडणूक नैसर्गिक वातावरणात व्हावी अशी मागणी भाजपने केली आहे.

कोरोना संकट काळात दोन दिवसाच्या अधिवेशनात काही आमदार अनुउपस्थिती आहे. त्यात निवडणुकींची घाई का? असा सवाल भाजपचे विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थितीत केला.

सोमवारी विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आमदार नीलम गोऱ्हे यांनी अर्ज भरला आहे. तर भाजपकडून आमदार भाई गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  पण, 78 सदस्यीय विधान परिषदेत 18 जागा सध्या रिक्त आहेत. उर्वरित 60 पैकी 23 सदस्य भाजपचे आहेत तर सत्ताधारी महाविकास आघाडीकडे शिवसेना 15, राष्ट्रवादी 9, काँग्रेस 8, लोकभारती 1 असे 33 आमदारांचे संख्याबळ आहे. महाविकास आघाडीकडे जास्त संख्याबळ असल्यामुळे नीलम गोऱ्हे यांची निवड होण्याचे चिन्ह आहे.

काय आहे विधानपरिषदेतील संख्याबळ?

एकूण संख्या - 78

राष्ट्रवादी - 9

काँग्रेस - 8

शिवसेना - 14

भाजप - 22

लोकभारती - 1

पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया - 1

राष्ट्रीय समाज पक्ष - 1

अपक्ष - 4

रिक्त - 18

First published: