मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai मधील केईएम रुग्णालय, सेठ जी. एस मेडिकल कॉलेजच्या 22 विद्यार्थ्यांना Corona

Mumbai मधील केईएम रुग्णालय, सेठ जी. एस मेडिकल कॉलेजच्या 22 विद्यार्थ्यांना Corona

22 MBBS students tests positive for covid19 in Mumbai: मुंबईतील एमबीबीएसच्या 22 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

22 MBBS students tests positive for covid19 in Mumbai: मुंबईतील एमबीबीएसच्या 22 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

22 MBBS students tests positive for covid19 in Mumbai: मुंबईतील एमबीबीएसच्या 22 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

मुंबई, 30 सप्टेंबर : मुंबईतील केईएम रुग्णालय (KEM Hospital Mumbai) आणि सेठ जी एस मेडिकल कॉलेज (Seth G S Medical College)मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या 22 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग (MBBS students covid positive) झाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा, मंदिरे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर 22 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे.

दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग

या संदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी म्हटलं, केईएम रुग्णालय आणि सेठ जी एस मेडिकल कॉलेजच्या 22 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते तरी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे म्हणून मास्क घालणं गरजेचं आहे. मागील दोन तीन दिवसांतच सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यामुळे कोरोनाचा प्रसार झाल्याची शक्यता आहे.

कोरोना अद्याप पूर्णपणे गेलेला नाहीये. कोरोनाचा संसर्ग झालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. पुढील महिन्यात शाळा सुरू होत आहेत. 8 वी ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू होतील. पालकांची संमती घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत घेतलं जाईल. पालकांना विनंती आहे शाळा सुरू होत आहेत, तुमची परवानगी असेल तर प्रवेश मिळेल. या संदर्भात शाळा समिती कडे पालकांनी सम्पर्क करावा असंही महापौरांनी म्हटलं आहे.

4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू

4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण, 'विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याची सक्ती नाही. पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये, कोरोनाची संपूर्ण खबरदारी घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

शाळा सुरू करण्याच्या संदर्भात शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना

प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करणे

शक्य असल्यास क्लिनिक सुरू करावे

विद्यार्थ्यांचे नियमितपणे टेम्परेचर तपासावे

शक्य असल्यास यासाठी इच्चूक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी

सर्व शाळा आरोग्य केंद्रांशी संलग्न कराव्यात.

हेल्थ क्लिनिकमध्ये स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर आणि परिचारीकांची मदत घ्यावी.

उपरोक्त कामासाटी CSR किंवा स्थानिक निधीतून खर्च करण्यात यावा.

शाळेत येताना घ्यावयाची काळजी

मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावे.

ज्या शाळांमध्ये स्कूल बस, खाजगी वाहनाद्वारे विद्यार्थी येतात अशा वाहनांमध्ये एका सिटवर एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल याची दक्षता घेण्यात यावी.

विद्यार्थी बसमध्ये चढताना व उतरताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहन चालक / वाहक यांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे.

शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सूचना

जेवण आणि इतर बाबी केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरने हात धुण्याबाबत विद्यार्थ्यांना सतत सूचना द्याव्यात.

विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत निर्देश द्यावेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही.

वेळ असल्यास गृहपाठ शक्यतो वर्गामध्येच करुन घ्यावा.

First published:

Tags: Coronavirus, Mumbai