Home /News /mumbai /

मुंबईतून धक्कादायक बातमी, शवगृहातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबईतून धक्कादायक बातमी, शवगृहातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या शवगृहातील 3 कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई, 24 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांनाही कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आली आहे. आता केईएम रुग्णालयातील शवगृहातील 3 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या शवगृहातील  3 कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या विभागात एकूण 27 कर्मचारी काम करतात आणि त्यापैकी 3 जण आता रुग्णालयात दाखल झाले आहे.  कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे कर्मचारी कमी आणि काम जास्त अशी परिस्थिती आहे. हेही वाचा -राज्यात गेल्या 24 तासांत 87 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह धक्कादायक म्हणजे, शवागृहातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली हे स्पष्ट झाल्यानंतर  इतर कर्मचाऱ्यांची अजूनही तपासणी झालेली नाही.  त्या कर्मचाऱ्याचे स्वॅबचे रिपोर्ट घेण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यात कोरोनाचा आकडा 50 हजाराच्या उंबरठ्यावर दरम्यान,  मुंबई, उपनगरं आणि पुण्यात गेल्या 24 तासांत   तब्बल 2608 रुग्ण राज्यभरातून वाढले आहेत. तर 24 तासांत 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू नोंदला गेला आहे. यात 40 मुंबईत तर 14 पुण्यातले रुग्ण आहेत.आतापर्यंत 1577 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ही देशातली सर्वात मोठी संख्या आहे. हेही वाचा -ऑटो, टॅक्सीवर बंदी; तर आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकर प्रवास कसा करतील? राज्य सरकारने शनिवारी संध्याकाळी पाठवलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 47190 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 3,48,026 जणांची COVID-19 ची चाचणी करण्यात आली आहे. राज्यभरात घरी विलगीकरणात असलेले (Home Quarantine) 4 लाख 85 हजार 323 जण आहेत तर 33545 लोकांना संस्थात्मक विलगीकरणात (Institutional Quaratine) ठेवण्यात आलं आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या