Home /News /mumbai /

Kandivali Murder: प्रेमप्रकरणातून ड्रायव्हरनं केली 3 महिलांची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना

Kandivali Murder: प्रेमप्रकरणातून ड्रायव्हरनं केली 3 महिलांची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबईतील कांदिवली पश्चिममध्ये (Kandivali, Mumbai) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका व्यक्तीने प्रेमकरणत तीन महिलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    मुंबई, 30 जून : मुंबईतील कांदिवली पश्चिममध्ये (Kandivali, Mumbai) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका व्यक्तीने प्रेमकरणत तीन महिलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून हा सर्व प्रकार उघडकीस आल्याची माहिती, प्राथमिक तपासामध्ये पुढे आली आहे. काय आहे प्रकरण? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांदिवली पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या दोन मुली आणि त्यांच्या आईची ड्रायव्हरनं धारधार शस्त्रानं हत्या केली आणि नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. या ड्रायव्हरचं लहान मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यामधून त्याचा आणि मुलीच्या आईचा जोरदार वाद झाला. या वादातून त्यानं पहिल्यांदा मुलीच्या आईची हत्या केली. त्यानंतर दोन्ही बहिणीचा जीव घेत स्वत: आत्महत्या केली. किरण दळवी, मुस्कान दळवी आणि भूमी दळवी अशी या मृत महिलांची नावं आहेत. तर  शिवदयाल सेन असं ड्रायव्हरचं नाव आहे. Pune Crime : नोकरीवरून काढून टाकले म्हणून दुकानच जाळले, मालकाचे केले लाखो रुपयांचे नुकसान कांदिवली पोलिसांनी सर्वांचे मृतदेह पोस्टमार्टमला पाठवले असून पुढील तपास केला जात आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Crime news, Mumbai, Murder

    पुढील बातम्या