S M L

बीएमसीला जाग आली, कमला मिलमधील अनधिकृत पब-रेस्टाॅरंटवर हातोडा

Sachin Salve | Updated On: Dec 30, 2017 07:00 PM IST

बीएमसीला जाग आली, कमला मिलमधील अनधिकृत पब-रेस्टाॅरंटवर हातोडा

30 डिसेंबर : लोअर परेलच्या कमला मिल्स कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 निष्पापांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आलीये. आज सकाळपासून लोअर परळ भागातल्या कमला मिल आणि रघुवंशी मिलमधल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केलीये.

कमला मिलमधील वन अबाव या रेस्टाॅरंटवर धडक कारवाई करत अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलंय. तर वरळीच्या रघुवंशी मिल कंपाऊंडमधील पनाया आणि शिसा स्काय लाऊंजने उभारलेल्या अनधिकृत शेडस पाडण्यात आल्या आहेत. आज दिवसभर अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू राहणार आहे.  कमला मिल कम्पाउंडमध्ये असे अनेक रेस्टॉरंट असून बेकायदा बांधकामही मोठ्या प्रमाणात असल्याचं समोर आलंय.

मुंबई पालिकेची कारवाई स्वागतार्हच आहे. पण ही कारवाई आधीच आणि मुंबईभर केली असती, तर अनेकांचे जीव वाचले असते.


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2017 07:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close