Home /News /mumbai /

Mumbai Fire: मुंबईतील कमला इमारतीत अग्नितांडव, 6 जणांचा होरपळून मृत्यू तर 15 जखमी

Mumbai Fire: मुंबईतील कमला इमारतीत अग्नितांडव, 6 जणांचा होरपळून मृत्यू तर 15 जखमी

Mumbai kamala building fire 7 died: मुंबईतील ताडदेव परिसरात लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत.

    मुंबई, 22 जानेवारी : मुंबईतील ताडदेव परिसरात असलेल्या कमला इमारतीला सकाळच्या सुमारास आग (Kamala building fire in Tardeo Mumbai) लागली. या आगीत तब्बल 6 जणांचा मृत्यू (7 people died in Kamala building fire Mumbai) झाला आहे तर 15 जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शर्थीने आगीवर नियंत्रण मिळवत इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. (6 people died in fire incident of 20 storey Kamala Building Tardeo Mumbai) ताडदेव परिसरात असलेल्या भाटीया रुग्णालयाच्या जवळील कमला या बहुमजली इमारतीला आग लागली आहे. सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 15 जखमींपैकी सात जणांवर नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दोघांना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर 14 जणांना उपचारासाठी भाटीया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत अग्नितांडवाच्या घटना सुरूच वन अविघ्न पार्क इमारतीत अग्नितांडव 22 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईत इमारतीला भीषण आगलागली होती. लोअर परेल परिसरात रहिवासी इमारतीच्या 19व्या मजल्यावर भीषण आग लागली होती. लालबाग (Lalbaug) परिसरात असलेल्या वन अविघ्न पार्क इमारतीला आग (Fire at One Avighna Park) लागली होती. ही आग लागल्यानंतर एका इसमाने इमारतीवरुन बचावासाठी 19व्या मजल्यावरुन उडी घेतली असल्याचा एक भयंकर व्हिडीओ समोर आला होता. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, इमारत उंच असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत होत्या. वन अविघ्न पार्क ही 60 मजली इमारत असून तिच्या 19व्या मजल्यावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. वाचा : उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी साधणार संवाद, आगामी निवडणुकांसाठी काय देणार कानमंत्र? 12 नोव्हेंबरला मानुखुर्दमध्ये आग 12 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मानखुर्दमध्ये भीषण आगलागली होती. या आगीत अंदाजे 10 ते 12 दुकान जाळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि पाण्याचे बंब घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवले. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. अवघ्या काही क्षणातच गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडले. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. 17 सप्टेंबर रोजीही मानखुर्दमध्ये भीषण आग यापूर्वी 17 सप्टेंबर 2021 रोजीही पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मानखुर्द येथे भंगाराच्या गोदामाला आग (fire breaks out at scrapyard) लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. ही आग इतकी भीषण होती की आगीच्या मोठ मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट लांब-लांबून दिसत होते. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. या भीषण आगीचे व्हिडीओ समोर आले होते. ते पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. शर्थीचे प्रयत्न करुन अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले होते.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Mumbai

    पुढील बातम्या