S M L

विद्यार्थिनींनी स्कर्ट वापरू नयेत; जेजे मेडिकल कॉलेजचा अजब फतवा

जेजेमध्ये आता डीन चंदनवाले यांच्या नावाने मुलींसाठी अजब फतवा काढण्यात आला आहे.

Updated On: Mar 23, 2019 12:50 PM IST

विद्यार्थिनींनी स्कर्ट वापरू नयेत; जेजे मेडिकल कॉलेजचा अजब फतवा

मुंबई, स्वाती लोखंडे, 23 मार्च : मुलींनी कोणते कपडे घालावेत किंवा घालू नयेत यासारख्या घटना यापूर्वी देखील मुंबईत समोर आलेल्या आहेत. शिवाय, कॉलेजनं काढलेले अजब फतवे आता काही नवीन नाहीत. असाच फतवा आता मुंबईतील जेजे मेडिकल कॉलेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी काढण्यात आला आहे. यामध्ये फेस्टिवलच्या दिवशी विद्यार्थिनींनी तोकडे कपडे किंवा स्कर्ट घालू नका असा मेसेज डीन चंदनवाले यांच्या नावाने पाठवण्यात आला आहे.

18 मार्च पासून जेजेमध्ये कॉलेज फेस्ट सुरू आहे. पण, शुक्रवारी हॉस्टेलच्या वॉर्डनकडून डीन चंदनवाले यांच्या नावाने मेसेज फॉरवर्ड करण्यात आला. ज्यामध्ये फेस्टिवलमध्ये मुलींनी तोकडे कपडे घालू नयेत असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरच न थांबता त्यामध्ये मुलींनी रात्री 10 वाजण्यापूर्वी हॉस्टेलला परत आलं पाहिजे. मुलं आणि मुलींनी वेगळं बसावं, मुलं- मुलींनी एकत्र डान्स करू नये असे नियम आखून देण्यात आले आहेत. तर, मुलांना मात्र कितीही वाजता परत येण्याची मुभा देण्यात आली आहे.VIDEO : मुलं मुलींकडे बघणार नाहीतर काय मुलांकडे बघणार? उदयनराजेंचं विद्यार्थिनीच्या प्रश्नावर उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 12:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close