Mumbai Rains: मुंबईकरांना जेट एअरवेजने दिली 'ही' सूट

हतुक कोंडीमुळे अनेकांना वेळेत विमानतळावर पोहोचता आले नाही

News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2018 01:37 PM IST

Mumbai Rains: मुंबईकरांना जेट एअरवेजने दिली 'ही' सूट

मुंबई, 10 जुलैः मुंबईत होणाऱ्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली असून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे गाड्याही उशिराने धावत आहेत. या सर्वाचा फटका विमान प्रवासावरही झाला. वाहतुक कोंडीमुळे अनेकांना वेळेत विमानतळावर पोहोचता आले नाही. त्यामुळे अनेकांच्या फ्लाइट चुकल्याही. पण जेट एअरवेजने त्यांच्या प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे.

Loading...

पावसामुळे जे प्रवासी योग्यवेळी विमानतळावर पोहचू शकले नाहीत, त्यांची जेट एअरवेजने दुसरी तरतूद केली आहे. मुंबईकडून जाणारे प्रवाशी त्यांच्या सोयीनुसार फ्लाइटची तारीख, वेळ बदली करु शकतात. दुसरी फ्लाइट घेतल्यावर प्रवाशांना कोणतीही अतिरिक्त रक्कम भरावी लागणार नाही. जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, मुंबईतील पावसामुळे अनेक फ्लाइट उशिराने उडत आहेत. त्यामुळेच सर्व प्रवाशांनी घरातून निघण्यापूर्वीच त्यांच्या फ्लाइटची स्थिती जाणून घेण्याबद्दल आम्ही सांगतो. तसेच विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांनी वेळेचं योग्य नियोजन करुन घरातून थोडे आधीच निघावे. यामुळे ते कोणत्याही अडथळ्यांशिवाय चेक- इन, सुरक्षेची चाचणी आणि बोर्डिंग करु शकतात.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत सुमारे 182.37 एमएम पाऊस झाला आहे. आतापर्यंत मुंबईत एकूण 1820 एमएम पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी मुंबईमध्ये एकूण 1066.20 एमएम पाऊस झाला होता. गेल्यावर्षीपेक्षा मुंबईत यावर्षी 747 एमएम जास्त पाऊस झाला आहे. तसेच अजून दोन दिवस तरी पावसाचा जोर कायम राहील असे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळेच मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला सतर्कतेचा इशा देण्यात आला आहे.

हेही वाचाः

पावसामुळे जागोजागी कोंडी, घराबाहेर न पडण्याचा सल्ला

पुराच्या पाण्यात तरुण गेला वाहून

भरपावसात लोकस सुसाट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2018 01:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...