तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक, पाहा कसं असेल लोकलचं वेळापत्रक

तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक, पाहा कसं असेल लोकलचं वेळापत्रक

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर आज 15 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 डिसेंबर: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी बाहेर पडताना लोकलचं वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेवर सकाळी 10.30 ते दुपारी 3.00 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरून वळवण्यात येईल.

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी असा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर बांद्रा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 मेगा ब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉक दरम्यानच्या काळात वाशी, बेलापूर, पनेवलहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कुर्ला ते पनवेल विशेष लोकल कुर्ल्याच्या फलाट क्रमांक 8 वरून सोडण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरून लोकलने प्रवास करू शकतात.

वाचा-निर्णायक तिसऱ्या सामन्यात होणार मोठे बदल, 'या' खेळाडूंना मिळणार संघात जागा

वाचा-शशी थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण!

पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदर दरम्यान विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. 11.00 ते दुपारी 03.00 मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सिग्नल, रुळ, ओवरहेड वायर यांसारख्या तांत्रिक कामांसाठी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. रेल्वेच्या विशेष कामांसाठी पश्चिम रेल्वेवर 11 ते 15 तासांचा विशेष मेगाब्लॉक आज घेण्यात आला आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी वेळापत्रक पाहून बाहेर पडावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mumbai
First Published: Dec 22, 2019 08:03 AM IST

ताज्या बातम्या