Home /News /mumbai /

डॉक्टरांच्या रुपात परमेश्वरच; रेल्वे अपघातात हाताचे झाले दोन तुकडे, डॉक्टरांनी 11 तास शस्त्रक्रिया करुन जोडले

डॉक्टरांच्या रुपात परमेश्वरच; रेल्वे अपघातात हाताचे झाले दोन तुकडे, डॉक्टरांनी 11 तास शस्त्रक्रिया करुन जोडले

या शस्त्रक्रियेसाठी तब्बल अकरा तास लागले. शस्त्रक्रियेनंतर जवळपास 21 डॉक्टरांनी अहोरात्र त्याची काळजी घेतली. दरम्यान अजितला कोरोना झाल्याचं आढळून आलं.

    सुस्मिता भदाणे, न्यूज 18 प्रतिनिधी मुंबई, 27 एप्रिल : मुंबईच्या जे जे रुग्णालयातील रुग्णावर डॉक्टरांनी (JJ Hospital Doctor) तुटलेला हात जोडण्याची जटील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. 11 तास चाललेली ही देशातील एक आगळी-वेगळी अशी शस्त्रक्रिया (Operation) होती. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला कोरोनाची लागणही झाली होती. मात्र त्यावरही मात करत आता या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासाठी डॉक्टरांचं कौतुक केलं आहे. भायखळा रेल्वे स्थानकात 16 मार्च रोजी कामावर जाण्यासाठी धावत्या लोकल (Local Train)मध्ये चढण्याच्या प्रयत्नात अजित कुमार फलाटावर पडला. लोकलखाली आल्यानं कोपराच्या खाली त्याचा त्याचा संपूर्णपणे तुटला. तशाच अवस्थेत अजितला जे. जे. रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्याची परिस्थिती गंभीर होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. पण जेजे मधील शस्त्रक्रिया गृह दुरुस्तीसाठी बंद होतं. त्यामुळं जीटी रुग्णालयात शस्त्रक्रिया त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. (वाचा-लाखो खर्चूनही कोरोनाने आईबाबाला हिरावलं; कोरोनाग्रस्त चिमुकल्यानेच दिला मुखाग्नी) सुघटन शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत घारवाडे, सहयोगी प्राध्यापक डॉ. योगेश जयस्वाल व डॉ. नितीन मोकल यांनी ही अत्यंत कठिण शस्त्रक्रिया केली. अस्थि शल्य चिकित्सकांनी तुटलेल्या हाताचं हाड जोडून दिलं. त्याचवेळी रक्तवाहिन्या व मज्जारज्जू जोडण्याचं काम सुरू झालं. त्यानंतर जोडलेल्या हाताला आकार देण्याचे महत्त्वाचं काम होतं. त्यासाठी पायातील नसा काढून तुटलेल्या हाताला जोडण्यात आल्या. तर पोटावरील कातडी काढून तुटलेल्या हातावर पुन्हा आवरण चढविण्याचं काम प्लास्टीक सर्जन डॉ. जयस्वाल व डॉ. घारवाडे यांनी केलं. (वाचा-मोक्का गुन्ह्यातील आरोपी दीप्ती काळेची ससून रुग्णालयाच्या इमारतीवरुन आत्महत्या) या शस्त्रक्रियेसाठी तब्बल अकरा तास लागले. शस्त्रक्रियेनंतर जवळपास 21 डॉक्टरांनी अहोरात्र त्याची काळजी घेतली. दरम्यान अजितला कोरोना झाल्याचं आढळून आलं. त्यामुळं कोरोनावरील उपचारासाठी त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथंही पाच दिवस डॉक्टरांनी काटेकोर काळजी घेतल्यानंतर करोनामुक्त झाल्यानं पुन्हा त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोना काळातही अजितच्या हाताची दररोज काळजी घेणाऱ्या रेसिडंट डॉक्टरलाही कोरोना संसर्ग झाला. पण अजितची प्रकृती सध्या उत्तम आहे. त्याचा हात बचावल्याचं मोठं समाधान डॉक्टरांना आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही डॉक्टरांनी अजितसाठी घेतलेल्या कष्टाचं कौतुक केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mumbai News, Railway accident

    पुढील बातम्या