S M L

स्वप्ननगरी मुंबई ठरली देशातील सर्वात स्वच्छ राजधानी !

मुंबईकरांनो तुमच्यासाठी एक खुशखबर आहे, ती म्हणजे तुमची मुंबई देशातली सर्वात स्वच्छ राजधानी ठरली आहे. तर घनकचरा व्यवस्थापनातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार नवी मुंबई महापालिकेला मिळाला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 17, 2018 12:01 PM IST

स्वप्ननगरी मुंबई ठरली देशातील सर्वात स्वच्छ राजधानी !

मुंबई, 17 मे : मुंबईकरांनो तुमच्यासाठी एक खुशखबर आहे, ती म्हणजे तुमची मुंबई देशातली सर्वात स्वच्छ राजधानी ठरली आहे. तर घनकचरा व्यवस्थापनातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार नवी मुंबई महापालिकेला मिळाला आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेचा निकाल काल जाहीर करण्यात आला आहे. त्यात ही माहिती मिळाली आहे.

यात देशातील दुसरे सर्वोत्कृष्ट राज्यासह विविध विभागांत १० शहरे स्वच्छ ठरलीयेत. यातील ६ शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे. ४ जानेवारी ते १० मार्च या कालावधीत देशातील चार हजार २०३ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

या स्पर्धेत झारखंड राज्याने सर्वोत्कृष्ट राज्याचे पहिले पारितोषिक मिळवले तर महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. तर छत्तीसगडने तिसरा क्रमांक मिळविला आहे. तर देशातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा मान इंदूर शहराने पटकावला आहे. तीन लाख ते १० लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये सर्वात अधिक गतीने स्वच्छतेकडे वाटचाल करणाऱ्या शहरांमध्ये भिवंडी-निजामपूर शहरास प्रथम क्रमांक मिळाला तर छोटय़ा शहरामध्ये (एक ते तीन लाख लोकसंख्या) भुसावळ शहराने पारितोषिक पटकावले आहे.पश्चिम क्षेत्रातील एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमधील स्वच्छ शहराचा मान पाचगणीने तर नागरिक प्रतिसाद विभागातील सर्वोत्कृष्ट शहराचा मान अमरावती जिल्ह्य़ातील शेंदूरजनाघाट शहराने मिळविला आहे. उत्कृष्ट नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मान सासवडला मिळाला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2018 12:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close