• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Mumbai News : होणाऱ्या बायकोला अश्लील मेसेज पाठवणे हा गुन्हा? जाणून घ्या कोर्टाचा निकाल

Mumbai News : होणाऱ्या बायकोला अश्लील मेसेज पाठवणे हा गुन्हा? जाणून घ्या कोर्टाचा निकाल

जाणून घ्या काय दिला कोर्टाने निर्णय...

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर : मुंबईतील (Mumbai Court)  एका न्यायालयाने लग्नाआधी होणाऱ्या बायकोला 'अश्लील मेसेज' पाठवणे हा एखाद्याच्या प्रतिष्ठेचा अपमान होऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने लग्नाचे आश्वासन देऊन बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने (A Mumbai Sessions Court)  आपल्या निकालात म्हटलं आहे की, लग्नापूर्वी होणाऱ्या बायकोला पाठवलेले मेसेज एकमेकांच्या भावना आणि आनंद समजून घेण्यासाठी विचारात घेतले जाऊ शकतात. (Mumbai Is it a crime to send obscene messages to ones future wife Know what court says) मिळालेल्या माहितीनुसार, एका 36 वर्षीय व्यक्तीवर 11 वर्षांपूर्वी त्याच्या होणाऱ्या बायकोने लग्नाचं आमिष दाखवून बलात्काराचा आरोप केला होता आणि गुन्हा दाखल केला होता. कोर्टाने सांगितलं की, जर एखाद्याला दुसरी व्यक्ती आवडत नसेल, तर त्याच्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचवणे हा त्याचा अधिकार आहे आणि दुसऱ्या पक्षाने अशी चूक टाळावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. या मेसेजचा उद्देश मंगेतरासमोर आपल्या इच्छा व्यक्त करणे, लैंगिक भावना जागृत करणे इत्यादी असू शकतात. हे मेसेजेस होणाऱ्या बायकोला आनंदी देखील करू शकतात. पण असे एसएमएस कोणाशी तरी लग्न करणार असलेल्या महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतील असे म्हणता येणार नाही. हे ही वाचा-ड्रग्ज माफिया वकिलाच्या मोबाईलमध्ये गुपितं दडली, मुंबई पोलीस कसं शोधणार? महिलेने 2010 मध्ये त्या व्यक्तीविरोधात FIR दाखल केला होता. हे दोघे 2007 मध्ये लग्नाच्या एका साइटवर (Matrimonial Site) भेटले होते. तरुणाची आई या लग्नाच्या विरोधात होती. 2010 मध्ये तरुणाने तरुणीसोबत असलेलं नात थांबवलं. कोर्टाने तरुणाची सुटका करीत सांगितलं की, लग्नाचं वचन देऊन मागे हटणे याला धोका देणे किंवा बलात्कार करणे असं म्हणू शकत नाही. कोर्टाने पुढे सांगितलं की, आर्य समाज हॉलमध्ये मंगळसूत्रासह गेला होताय. मात्र आईची इच्छा नसल्यामुळे तो मागे हटला.
  Published by:Meenal Gangurde
  First published: